पुणे,दि.६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांच्या स्मृतिंना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले. तसेच, विद्यापीठाचे विश्वस्त, कुलगुरू, विविध विभागातील विभाग प्रमुख, डीन, डायरेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पाअर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डब्ल्यूपीयूचे वरिष्ठ सल्लागार डॉ.संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्रा.डॉ. विनोद जाधव व प्रा.डॉ. दत्ता दांडगे उपस्थित होते.
विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगत डॉ. आंबेडकरांनी संत गाडगेबाबा महाराजांना कोणता धर्म स्विकारू असे विचारले होते. भारतात ज्या धर्माचा उगम झाला, अशा धर्माचा स्विकार करा असे गाडगेबाबा यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता आणि जातिवाद सारख्या सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. एमआयटी डब्ल्यूपीयूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे अध्यासन आहे, त्या माध्यमातून आता वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.”
त्यानंतर डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये, डॉ.मिलिंद पांडे, गणेश पोकळे, डॉ. दत्ता दांडगे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, कायदेपंडीत, संसदपटू, समाजसुधारक तसेच भारताच्या इतिहासावर त्यांनी आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.प्रा.विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
एमआयटी डब्ल्यूपीयूत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन.
Date:

