Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांनी सोलापुरात दंगलीचा कट आखला होता; प्रणिती शिंदे यांचा आरोप

Date:

भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे-मग भाजप अन् दहशतवाद्यात काय अंतर?

सोलापुर-लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांनी सोलापुरात दंगली घडवण्याचा कट आखला होता. लोकसभेच्या मतदानाआधी दोन दिवस दंगल घडवणार होते. हे लोक रक्ताने राजकारण करतात, असा गंभीर आरोप सोलापूरच्या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसह सोलापुरातील भाजप नेत्यांचे नाव घेत हा गंभीर आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आता भाजपच्या गोटातून या आरोपाला काय प्रत्युत्तर मिळते ते पाहावे लागेल.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपावाले ही लोक रक्ताने राजकारण करतात. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे, असा निशाणा त्यांनी लगावला.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपचे राज्यातील बडे लोक हे गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. ते कानात सांगितलं गेलं होतं. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं, जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे, दंगल घडवून आणा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंवर देखील निशाणा साधला.संविधान संपविण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने चपराक लावली. भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे? हे देशात राहून भांडण लावत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सोलापुरात दंगली घडविण्याची योजना होती. भाजपने किती पैसे वाटप केले. एक साडी आणि 500 रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे दिले तरी तुम्ही त्यांना मतदान केले नाही, असे त्या सभेला उद्देशून म्हणाल्या. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे आता भाजपकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

प्रणिती शिंदे या कार्यक्रमात बोलताना पुढे म्हणाल्या की, हा विजय सर्वसामान्य माणसाचा, कामगारांचा, कष्टकरी माणसाचा आहे. मी खासदार केवळ तुमच्यामुळे झाली आहे, याची मला जाणीव आहे. खासदारकी डोक्यात गेली, असं जेव्हा तुम्हाला वाटलं तर, दणकण मला खाली ओढा. शिंदे साहेब म्हणाले की, माझे नेतृत्व अनेकजण स्वीकारायला तयार नाही, पण शिंदे साहेब तुम्ही किंगमेकर आहात, न संपणारे नेतृत्व आहात. तुम्ही अनेक निवडणुका लढल्या, मी स्वतः पाहिलंय की, आमच्या घरी लोकं चाकू-तलवार घेऊन आले होते. अशा निवडणुका तुम्ही लढल्या, लढाऊपणा मी तुमच्याकडून शिकले, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी सुशीलकुमार शिंदेंचे तोंड भरून कौतुक केलं.प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मी लहानपणापासून सत्ता बघितली, घरासमोर नेहमी लाल दिव्याची गाडी होती. मी लोकांचे काम करण्यासाठी राजकारणात, मी सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. महाविकास आघाडी असताना आम्ही कधीही मंत्रिपद मागितलं नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. मी शिवसेना उद्धव साहेबांचे खास आभार मानते, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. भाजपवाले म्हणायचे, आम्हाला नका बघू आणि मोदींना बघून मतदान झालं, बरं झालं ते असं म्हणाले त्यांच्यामुळेच तुम्ही मोदींना बघितलं आणि मला मतदान केलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, जे मतदारसंघात फिरले नाहीत त्या भाजपच्या आमदाराचे ही आभार मानते. 14 खासदार हे आता काँग्रेसचे आहेत, येणारा काळ हा देखील काँग्रेसचा आहे. आता एकच फाईट, कॉलर टाईट. केवळ माझी नाही तुमची ही कॉलर टाईट. इथून पुढे आता कामं घेऊन या, माझ्याकडे यायला कोणीही रोखणार नाही, पुढाऱ्यांचा आदर करते, पण तुम्ही देखील थेट कामं घेऊन या. मी कामं केलं नाही तर, कान पकडून मला खाली बसवा, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...