मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक

Date:

मुंबई –भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवित मॉडर्न पेंटॅथलॉन लेझर रन जागतिक स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.‌ ही स्पर्धा झेंगझोऊ, चीन येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत ५२ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा लहान वयोगट, कनिष्ठ, वरिष्ठ, मास्टर्स अशा एकूण बारा वयोगटात घेण्यात आली. त्यामध्ये वैयक्तिक, सांघिक आणि रिले प्रकारात स्पर्धांचा समावेश होता. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे भारताच्या २२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, बिहार येथील खेळाडू सहभागी झाले होते.
एमपीएफआयतर्फे अमरावती येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लेझर रन स्पर्धेतून या खेळाडूंची निवड करण्यात आली.

करण मिल्के (महाराष्ट्र), उदेश मजिक (गोवा), आदित्य आनंद (बिहार) यांनी कुमारांच्या सांघिक गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिले. १९ वर्षाखालील गटात प्रिन्स कुमार (बिहार) आणि अन्नू कुमारी (झारखंड) यांनी मिश्र रिले स्पर्धेत भारतासाठी प्रथमच कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. मॉडर्न पेंटॅथलॉनचे भारतीय प्रशिक्षक वैभव चाफेकर यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले आणि खेळातील बारकावेही शिकवले. प्रत्यक्ष स्पर्धेतही त्यांनी भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन व नेतृत्व केले.

मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री. विठ्ठल शिरगावकर यांनी विजेत्या संघाचे जल्लोषात स्वागत करीत सर्व विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती. संध्या पालिकर यांनी ही विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या.

आधुनिक पेंटॅथलॉन हा एक ऑलिम्पिक खेळ आहे आणि त्याचे उप-खेळ जगभरात खेळले जातात. हा खेळ अतिशय साहसी असून तो खेळाडूची शारीरिक आणि मानसिक चाचणी घेतो. त्यात पोहणे, इपी फेन्सिंग, अडथळे, धावणे आणि नेमबाजी यांचा समावेश आहे. बायथलॉन, ट्रायथलॉन आणि लेझर-रन हे या खेळाचे उप-खेळ आहेत.

“आधुनिक पेंटॅथलॉन आणि त्याचे उप-खेळ भारतात खूप लोकप्रिय होत आहेत” असे सांगूनश्रीमती. संध्या पालिकर यांनी भविष्यात भारत यामध्ये चमकदार यश मिळवेल असा विश्वासही व्यक्त केला आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोंढव्यातील महेंद्र लोणकर यांचेवर गुन्हा दाखल

भरमसाठ कर आकारणीचा आरोप करत, तो कमी करण्यासाठी ...

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी...

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य...