Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

औरत हैं, तो भारत है… ५ हजारहून अधिक महिलांना सन्मानित करणार

Date:

एमसीए आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगने फ्रॅंचाईजी रायगड रॉयल्ससह औरत हैं, तो भारत है कार्यक्रमाच्या सादरीकरणातून यशाचा आनंद करणार व्यक्त

पुणे, 14 जुन 2024:   महाराष्ट्र प्रिमिरयर लीग ही महाराष्ट्रातील एकमेव ट्वेन्टी-२० किकेट लीग आहे. याची सुरुवात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्रातील महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आता एमपीएलने ‘औरत हैं ते भारत है…’ या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम शनिवारी १५ जून रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या विविध भागातील ५ हजारहून अधिक महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र प्रिमियर लीगने आमंत्रित करण्यात आलेल्या महिलांसाठी वाहतूक आणि भोजनाची सर्व समावेशक व्यवस्था देखिल करण्यात आली आहे. या वेळी उपस्थित प्रत्येकाला रायगड रॉयल्सच्यावीने कौतुकाचे प्रतिक म्हणून या कार्यक्रमासाठी रायगड रॉयल्सने खास निर्माण केलेली ‘औरत हैं, तो  भारत है ‘ ही खास जर्सी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळालेल्या नामवंत महिलांचा समावेश असणार आहे. सन्मानित करण्यात येणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने आदिती तटकरे, (महिला व बाल विकास मंत्री, ऑलिम्पियन अंजली भागवत, मेरी कोम, राही सरनोबत, अनु आगा, सुलजा फिरोदिया अशा अनेक गणमान्य महिलांचा समावेश आहे.

या महिलांना कार्यक्रमाचे निमंत्रण एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार असून, निमंत्रणाबरोबर देण्यात येणाऱ्या भेटीत ‘औरत है तो भारत है जर्सी ‘आणि गुलाबी दुपट्ट्याचा समावेश आहे.

रायगड रॉयल्स वि. पुणेरी बाप्पा यांच्यातील सामन्यापूर्वी हा सोहळा पार पडणार आहे. या वेळी संघातील प्रत्येक खेळाडू हा आपल्या आईसोबत राष्ट्रगीतासाठी उभा राहिल. हे दोन्ही संघ त्या दिवशी ‘औरत है तो भारत है’ जर्सी परिधानकरूनच खेळतील. आई बद्दल असणारा आदेर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या जर्सीमागे त्याच्या आईचे नाव लिहिलेले असेल.

महाराष्ट्रातील अपवादात्मक महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्यामुळे या सोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन एमसीए आणि एमपीएलने केले आहे.

कार्यक्रमाविषयी..
कार्यक्रमाचे नाव – औरत है, तो भारत है
तारीख – शनिवार १५ जून २०२४
वेळ – सायंकाळी ६ वाजता
स्थळ – एमसीए आंतरराष्ट्रीय मैदान, गहुंजे, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशात दोन लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्थासहकार क्षेत्राला ११ वर्षांत ४ लाख २१ हजार कोटी

सहकारी सोसायट्यांच्याा संगणकीकरणासह गोदामांच्या उभारणीलाही गती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा २१ डिसेंबर रोजी ‘संकल्प मेळावा’

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मित्रपक्षाचे नेते...

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027,बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट...