पुढच्या १० वर्षातं सगळे बदललेले असेल-केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Date:

नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार
मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला

नवी दिल्ली/पुणे-‘पुढच्या १० वर्षातं सगळे बदललेले असेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरु करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करुन गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.’असे पुण्याचे खासदार,केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

त्यांनी काल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनीही पदभार स्विकारला. यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारमधले हे महत्त्वाचे खाते आहे. या क्षेत्रात आव्हानं खूप असली तरी गेल्या दहा वर्षात या विभागात खूप मोठे काम झाले आहे. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. मला आठवते आहे, पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो. मात्र, त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण समोरच्या खुर्चीवर कधीकाळी बसू. भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे.

याप्रसंगी ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी, तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला...

‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर,32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 7 जण जेरबंद

मुंबई-क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर...

पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार ,त्यांचे सर्व प्रश्न सोडविणार -महापौर

पुणे-महापालिका हद्दीतील प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित...

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...