अपघातग्रस्त पुणे अशी ओळख निर्माण होऊ देऊ नका – खा.मेधा कुलकर्णी

Date:

पुणे- पुणे शहराचा लौकिक बिघडू देऊ नका , अपघातग्रस्त पुणे अशी नवी ओळख निर्माण होऊ देऊ नका , वाहतूक पोलिसांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे,पुणे वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हवे तर राज्यसभेतही आवाज उठवू असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले

खासदार कुलकर्णी यांनी काल चांदणी चौकात झालेल्या अपघाताच्या ठिकाणी तातडीने अपघात स्थळी जाऊन भेट दिली. पोलीस अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, नागरिक यांच्याशी चर्चा केली.चांदणी चौकाच्या कोथरूडकडे येणाऱ्या उतारावर एक मालवाहतूक एसटी महाकार्गो ही मिक्सरला धडकली आणि त्याच्यानंतर तिने दुचाकीला उडवले आणि तीन जण गंभीर झाले.त्या म्हणाल्या,’पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रोज दोन तीन ठिकाणी अतिशय गंभीर असे अपघात होतात. या संदर्भामध्ये मी देवेंद्रजी यांनाही पत्र लिहिलं आहे आणि १४ तारखेला मुंबईला ते देवेंद्रजींना देणार आहे. महानगरपालिका आणि पोलीस खातं यांची एक संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी काहीतरी इलाज करायला पाहिजे आणि हा प्रत्येक प्रत्येक ठिकाणी उपाययोजना करायला हव्यात. चौकाच्या रचनेतील दोष सुधारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रस्ते वाहतुकीसाठी अतिक्रमण मुक्त करणे, वाहनांना जड वाहनांना बंदी च्या नियमाचे काटेकोर पालन, वाहतुकीचे नियमांचे पालन आणि त्यावर पोलिसांचे नियंत्रण या सगळ्या गोष्टींची मागणी मी केली आहे.आगामी काळात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन पुणे वाहतुकीसाठी सुलभ आणि सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...