पुणे, दि. १२ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स या दोन्ही योजनांच्या थकीत कर्जास मंडळाने खादी आयोगाच्या परिपत्रकानुसार दंडव्याज माफी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात या योजनेचे १ हजार १८५ थकीत कर्जदार असून या कर्जदारांनी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे थकीत रकमेचा एकरकमी भरणा केल्यास सबंधितांना दंडव्याज माफी लागू होणार आहे. थकीत कर्जदारांनी या दंडव्याज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी केले आहे.
0000

