पुणे- उत्तमनगर येथील एका नागरिकाचा मोबाईल हॅक करुन त्याची साडेपाच लाखाची लुट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पो स्टे ६१/२०२४, भादविक ४१९,४२०, माहिती व तंत्रज्ञान का.क.६६ (ड) गुन्हा नोंदविण्यात आला असून एक नागरिक वय ४२ वर्षे रा. उत्तमनगर पुणे यांनी फिर्याद नोंदविली आहे . एका अज्ञात मोबाईल धारक व विविध बँकेचे खातेधारक असलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले कि,’ दिनांक ०४/०६/ २०२४ ते ०९/०६/ २०२४ रोजी ऑनलाईन माध्यमाव्दारे
यातील फिर्यादी यांना त्यांची मॅक्स लाईफ पॉलीसी बंद झाली आहे त्यामध्ये जमा झालेली रक्कम काढायची असल्यास वरीष्ठांशी बोलावे लागेल असा फिर्यादी यांचा विश्वास संपादन त्यांचा मोबाईल हॅक करुन त्यांना लोन देवुन फिर्यादी यांची एकुण ५,५०,४९९/- रु.कि.ची. फसवणुक केली.
मोबाईल हॅक करुन साडेपाच लाखाची लुट
Date:

