कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 12 जून रोजी दक्षिण कोंकणात बहुतेक ठिकाणी व उत्तर कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाउत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा इशारा दिला आहे.
पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा इशारा दिला आहे. तर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना, मुसळधार पाऊस आणि वादळी वारा इशारा दिला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने विदर्भाकडे कूच करण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत मौसमी वाऱ्यांनी निम्मा महाराष्ट्र व्यापला होता. मंगळवारी (ता. 11) मान्सून अकोला, पुसद येथे पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली. त्यामुळे पुढील 3 दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मुंबई पुण्यातही पावसाची शक्यता
राजधानी मुंबईतही आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आज पुणे शहर आणि परिसरातही पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पुणे शहरात पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी भरल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पुणेकरांना त्रासाचा सामना करावा लागला आहे.

