पुणे- नळ स्टॉप , प्रभात रोड ,गरवारे ब्रिज ते एरंडवणे अग्निशामक दल रस्ता अशा एरंडवणे भागातील विविध रस्त्यावरील इमारतींच्या साईड मार्जिन मध्ये सुरु असलेल्या हॉटेल्स आणि परमिट रूमच्या अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. आज प्रभात रस्त्यावरील हॉटेल देहाती, कर्वे रस्त्यावरील मिर्चमसाला एरंडवण्यातील निसर्ग अशा काही हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली . हि कारवाई अशीच सलग सुरु ठवण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. साईड मार्जिन मधील बांधकामे अतिक्रमणे यामुळे येथील वाहनांचे पार्किंग रस्त्यावर येते आहे आणि या परिसरात वाहतूक कोंडी ला नित्यनियमाने तोंड द्यावे लागते आहे.


