Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणारी महिला येरवडा तपास पथकाकडून अटक

Date:

पुणे-घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या एका महिलेला येरवडा तपास पथकाने अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि.२८/०५/२०२४ रोजी घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३,३६,८००/- रु.किं.चे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन घेवून गेली आहे. बाबत येरवडा पो.स्टे.गु.र.नं.३३५/२०२४ भादवि ३८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा तुषार खराडे, किरण घुटे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी ही तिचे मुळ गावी किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेल्या माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले
त्याप्रमाणे तपास पथकाचे पो.उप. निरी. स्वप्निल पाटिल, व स्टाफ यांनी जावून संशयीत महिलेस ताब्यात घेतले. तिला नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव सायली संतोष कार्वे वय २२ वर्षे रा.मु.पो. किन्हई ता. कोरेगाव जि. सातारा असल्याचे सांगितले. तिच्याकडे चौकशी करता तिने कल्याणीनगर भागात लहान मुलाचा सांभाळ करणेचे काम मिळवून सदर घरात प्रवेश करुन तेथील घरात चोरी केलेची कबूली दिली. सदर महिलेस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपी कडून १३,११,८००/-रु.किं.चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तिचेकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरात सुध्दा एका घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळवून तेथे सुध्दा चोरी केलेची कबुली दिली. त्यावरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी करता भारती विदयापीठ पो.स्टे.गु.र.नं.४४९/२०२४ भादवि ३८१ गुन्हा उघडकीस आला आहे. सदर गुन्हयातील ४,००,०००/- किं.चे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. असे एकूण २ गुन्हे उघडकीस आणून १७,११,८००/- रु.किं. चे सोन्या चांदीचे दागिनेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, विठ्ठल दबडे, येरवडा पोलीस स्टेशनचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, यांचे मार्गदर्शना- खाली तपास पथकाचे अधिकारी पो.उप. निरी. स्वप्निल पाटील, श्रेणी पो.उप. निरी. प्रदिप सुर्वे, पोलिस अमंलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गांजा विक्री करणा-या तरुणीला केले जेरबंद

पुणे- मुंढवा येथील एका गांजा विकणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला...

सदाबहार गीतांनी रसिकांची सायंकाळ ‘हसीन’

पुणे : धर्मेंद्र यांच्याविषयीचे किस्से आणि त्यांच्यावर चित्रित झालेल्या...

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरती

पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे, दि. 10...

तुळापूर–वढू (बु.) शिवस्मारक विकासाला गती; ५३२.५१ कोटींचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ...