बार- पब मालकांकडून 500 कोटी रुपयांचा वसुली (व्हिडीओ)

Date:

पुणेपुण्यात उत्पादन शुल्क विभागासमोर आमदार रवींद्र दांडेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले आहेत. कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो तसेच कोणत्या अधिकाराला दिला जातो, याची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवली. यासंदर्भातले गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर केले आहेत. मागच्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील बार आणि पब माध्यमातून 500 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी या वेळी केला आहे.

आमदार धंगेकर आरोप करत असतानाच संबंधीत पोलिस अधिकऱ्यांच्या वतीने स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच संतापले. एक आमदार म्हणून मी या ठिकाणी बोलायला आलो आहे. त्यामुळे मला शिकवू नका, असा कडक इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन विभागातील अधिकाऱ्यांना दिला. तुम्ही विधानसभेत नाही तर माझ्यासमोर बोलत आहात. त्यामुळे मला शहाणपणा शिकवू नका, अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. पुणे शहरात सुरू असलेल्या अवैध बारची यादी आमच्या समोर द्या, या बारवर आजपर्यंत का कारवाई करण्यात आली नाही? असा सवाल देखील रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर आणि आणि सुषमा अंधारे यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा संबंधीत अधिकाऱ्यांनी या वेळी माध्यमांसमोर केला. तरी देखील या विभागाचा जिल्हा प्रमुख म्हणून अशा पद्धतीने काही असेल तर याबाबत चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये दोष असणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यापूर्वी झालेल्या सर्व कारवाईपेक्षा दुपटीने कारवाई आमच्या विभागाकडून गेल्या वर्षभरात झाली आहे. आमच्या विभागाकडून आठ हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा दावा देखील अधिकाऱ्यांनी केला. आणि दुपटीने मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचा दावा देखील अधिकाऱ्यांनी केला आहे. पुणे विभागातून 500 कोटींपेक्षा जास्त महसूल राज्य शासनाला उपलब्ध करून दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले आहे.

हातात खोके आणि पैसे घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुण्यात आंदोलन केले. पुण्याची अवस्था ही उडता पंजाब सारखी झाली असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला आहे. उत्पादक शुल्क विभागाची वसुलीची यादी वाचली तर ती लग्नातील आहेराची यादी वाचण्यासारखे असल्याचे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. मागील वेळी ललित पाटील प्रकरणात देखील आम्ही या वसुलीचा आरोप केला होता. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. ललित पाटील प्रकरणात देखील अजय तावरे यांचे नाव घेतले होते. यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकाही पोलिस अधिकाऱ्याशी आमचे वैर नाही. मात्र तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी का खेळत आहात? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

https://x.com/DhangekarINC/status/1795025605018395116

दरम्यान या आंदोलनानंतर धंग कर यांनी ट्वीट करत एक यादी प्रसिद्धी केली आहेपः नेमके त्यात काय म्हटले आहे.

पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला. पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे सुपरटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते ती लिस्ट खालीलप्रमाणे, विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात. • विमाननगर परिसरातील लेट नाईट व रुफ टॉपवाले.. १.द माफिया १ लाख २. एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet ३. बॉलेर २ लाख महिना ४. 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स) ५. दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स) ६. मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स) ७. TTF rooftop ५० हजार (बाणेर) ८. बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi) ९. ठीखणा १.५ लाख ३ outlet चे १०. स्काय स्टोरी ५० हजार ११. जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण) १२. टोनी दा ढाबा ५० हजार १३. आयरीश ४० हजार १४. टल्ली टुन्स – ५० हजार १५. ऍटमोस्ट फेयर ६० हजार १६. रुड लॉज ६० हजार १७. द टिप्सी हॉर्स ६० हजार १८.रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार १९. 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड – १.५ लाख २०. कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना २१.कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना २२. स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना २३.सरोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना २४.जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना २५. ७ : साईबा हॉटेल ३००००/- या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये. २६. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर) २७. कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर) २८. कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी) २९. वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी) ३०.रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी – महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी) ३१. शाम जगवानी व इतर यांचे ११ वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख. ३२.एक्साइज division १२ – प्रत्येक ५० हजार – ६ लाख रूपये. ३३. दारु चे होलेसेलर ३२ – ५० हजार प्रत्येकी महिना. ३४. साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना ३५.नवीन परमिटरूमबार – १२ (ग्रामीण) ३६.नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका) ३७. बिअर शॉपी (ग्रामीण)- ३ ३८. बिअर शॉपी (शहर)- ५ स्वतः एजेंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती त्रातस्त एक्साईजच्या स्टाफनी दिलेली आहे. ७८ लाख रूपये महिना कलेक्शन असून २ वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे २.५ कोटी रुपये. अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत. हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड व पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...

पुण्यात हिंदू महासभा रिंगणात:महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती पुणे:अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी...

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 18 डिसेंबर : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध...