नवीन कायदे देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरतील: पोलीस महानिरीक्षक (IGP) ओमवीर सिंह बिश्नोई

Date:

गोवा, 22 मे 2024

पत्र सूचना कार्यालयाच्या (PIB) पणजी येथील केंद्राने, आज केंद्रीय गृह मंत्रालय आणि गोवा केंद्र पत्रकार यांच्या सहयोगाने भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNS), आणि भारतीय साक्ष अधिनियम (BSA) या तीन नवीन कायद्यांवरील ‘माध्यम कार्यशाळा (वार्तालाप)’ आयोजित केली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, पोलीस महानिरीक्षक (IGP) ओमवीर सिंह बिश्नोई यांनी उपस्थितांना संबोधित केले, तर न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. एन.पी. वाघमारे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

गोव्यातील प्रसारमाध्यम व्यावसायिकांमध्ये BNS BNSS आणि BSA या कायद्यांचा हेतू आणि दृष्टीकोन याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कायद्यांचा संक्षिप्त परिचय करणारी सत्रे यावेळी आयोजित करण्यात आली. यामध्ये उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि कॅनाकोनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी टिकम सिंह वर्मा यांनी भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यातील महत्वाच्या तरतुदींची माहिती दिली. सादरीकरणे येथे डाउनलोड करता येतील : (BNS PPT) and (CrPC and BNSS: Comparative Analysis) 

नवीन कायदे देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेला पूर्णपणे नवीन दिशा देणारे ठरतील, असे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी यावेळी सांगितले. 1 जुलै 2024 पासून  नवीन कायदे लागू होणार आहेत, आणि हा दिवस महत्वाचा ठरेल असे ते म्हणाले. नवीन कायदे लागू होणे म्हणजेच, पूर्वीच्या वसाहतवादी व्यवस्थेकडून, भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेल्या व्यवस्थेकडे संक्रमण असल्याचे ते म्हणाले. ब्रिटीश राजवटीत लोकांना शिक्षा करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण करणे हे एकमेव उद्दिष्ट होते, मात्र या नवीन कायद्यांमुळे ही व्यवस्था न्याय सुनिश्चित करण्याच्या दिशेने अधिक कार्यक्षमतेने पुढे जाऊ शकेल, असे त्यांनी नमूद केले.

नवीन कायद्यांनुसार, टाइमस्टँप केलेले पुरावे डिजिटल लॉकरमध्ये कसे संग्रहित केले जातात आणि न्यायालयांना वेळेवर कसे उपलब्ध केले जातात,याची तपशीलवार माहिती, पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी यावेळी दिली. यामुळे देशभरातील गुन्हा दाखल करण्याचा दर कसा सुधारेल हे ही त्यांनी सांगितले.तसेचबिश्नोई यांनी वेळेवर निकाल देण्यावर भर दिला आणि नवीन कायद्यांतर्गत स्थगितीवरील मर्यादा अधोरेखित केल्या.

नवीन कायद्यानुसार 7 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी फॉरेन्सिक तज्ञाची उपस्थिती कशी अनिवार्य करते,याचे तपशील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ .एन.पी वाघमारे,यांनी नमूद केले. फॉरेन्सिक पुरावे रेकॉर्ड करणे, गोळा करणे, त्यांची ने-आण करणे आणि ते संग्रहित करणे यासाठी BNSS प्रमाणित प्रक्रिया कशी अनिवार्य करते; हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विरोधात फॉरेन्सिक विभागाची भूमिका BNSS मध्ये अधिक स्पष्ट आणि संरचित आहे, असे निरीक्षण डॉ. एन. पी. वाघमारे यांनी मांडले.न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सुसज्ज आणि तयार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी जमलेल्या पत्रकारांना या संधीचा उपयोग करून फौजदारी न्याय व्यवस्थेच्या कार्यप्रणालीबद्दलच्या आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेण्याचे आवाहन केले. पत्रकार त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अर्थ लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात असे सांगत पत्रकारांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर पीआयबीचे उपसंचालक,गौतम एस कुमार,यांनी आपल्या उदघाटनपर भाषणातून प्रकाश टाकला.  सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, पणजीचे विभागीय प्रचार अधिकारी रियास बाबू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...