Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आर्थिक स्थिरता आणि कामाच्या गुणवत्तेमुळे रोहन बिल्डर्सला सलग १४ व्या वर्षीही क्रिसिल कंपनीकडून DA2+ ही ग्रेड प्रदान

Date:

ही उल्लेखनीय कामगिरी पूर्ण करणारी रोहन बिल्डर्स कंपनी देशातील काही निवडक विकसकांपैकी एक आहे

पुणे २१ मे २०२४: रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित विकसक रोहन बिल्डर्सने सलग १४ व्या वर्षी क्रिसिल मानांकन संस्थेकडून देण्यात येणारे प्रतिष्ठित DA2+ डेव्हलपर ग्रेडिंग कायम राखले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पूर्ण करणारी ती देशातील काही निवडक विकसकांपैकी एक आहे. क्रिसिल डेव्हलपर ग्रेडिंग देताना केवळ आर्थिक मापदंडच नाही तर व्यवस्थापन क्षमता, वेळेवर विक्री, संकलन, आणि वितरण यासह विकासकाच्या सर्व विभागातील कामकाज गृहीत धरले जाते.

रोहन बिल्डर्सचे संचालक श्री. सुहास लुंकड म्हणाले, “आम्ही स्वच्छ हवा, पाणी, मोकळी जागा यांसारख्या मूलभूत गरजा तसेच अनेक वर्षे भक्कमपणे टिकतील अशी घरे देताना एकत्र जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या गृहप्रकल्पांची रचना करत असतो. यामुळे आमच्या ग्राहकांना वेळेत आणि गुणवत्तेसह उत्तम गृहप्रकल्प देण्यास मदत होते. फक्त सद्यस्थिती कडे लक्ष न देता भूतकाळातील कोरोना महामारीसारखी संकट तसेच भविष्यातील आव्हाहनांचा विचार करून आज आम्ही भक्कम पणे उभे आहोत.”

रोहन बिल्डर्सने रिअल इस्टेट क्षेत्रात १५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचे ६५ पेक्षा अधिक गृहप्रकल्प पुणे आणि बंगळूर येथे निर्माण केले आहे. सुमारे ६० लाख चौरस फूट क्षेत्राचे सात गृहप्रकल्प बांधकामाधीन असून, लवकरच पुणे, बंगळूर, मुंबईसारख्या शहरांमध्ये नवीन ४ गृहप्रकल्पाचे नियोजन चालू आहे. रिअल इस्टेट मार्केटमध्ये गेल्या काही तिमाहीत नवीन प्रकल्प दाखल होण्याचे प्रमाण वाढत असून, विक्रीही तेजीत आहे. ताज्या रिअल इस्टेट संशोधन अहवालानुसार, या दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे सात आणि आठ महिन्यांची इन्व्हेंटरी आहे, जी गेल्या दशकातील सर्वांत कमी आहे. यावरून या शहरांतील मागणी वाढत असल्याचे स्पष्ट होते. पुढील किमान ३ ते ४ तिमाहीत हाच कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

क्रिसिलचे बिझनेस हेड आणि MI&A असेसमेंट विभागाचे प्रमुख बिनिफर जेहानी म्हणाले, “DA2+ ही ग्रेडिंग दर्शविते कि डेव्हलपर सर्व प्रकारचे गृहप्रकल्प हाताळण्यास तसेच वेळेत पूर्ण करण्यास सक्षम आहे. रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता असणे आवश्यक आहे, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास टिकवणे सोपे होते. तसेच रेराच्या अटींची पूर्तता करणे आणि ग्राहकांचा विश्वास मिळवणे या दोन्ही गोष्टींसाठी क्रिसिल रेटिंग सारख्या थर्ड पार्टी मूल्यांकन देणाऱ्या संस्थांची मदत होते. क्रिसिलचे डेव्हलपर ग्रेडिंग डेव्हलपरच्या क्रेडेन्शियलचे मूल्यांकन करण्यासाठी एक विश्वासार्ह बेंचमार्क प्रदान करते. क्रिसिल ग्रेडिंग ऑपरेशनल आणि आर्थिक उत्कृष्टता दर्शविते, जे भागधारकांनाही आश्वस्थ करते.”

रोहन बिल्डर्स रियल इस्टेटबरोबरच इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम क्षेत्रातही अग्रेसर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात अनेक राज्यांमध्ये सुमारे ८०० किलोमीटरपेक्षा अधिक कार्य केले आहे. ज्यामध्ये रस्ते, ब्रिज, बोगदे यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये ‘घाट की गुणी हा विशेष उल्लेखनीय प्रकल्प आहे, जो जयपूर येथील पाकिस्तानला जोडणाऱ्या अमृतसर वाघा बॉर्डर जवळ आहे.

इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टिंग या क्षेत्रात १६४ पेक्षा अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यातील सुमारे ७२% प्रोजेक्ट्स हे FMCG, Auto, Oil & Gas आणि Pharma क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय क्लायंट्स कडून रिपीट
ऑर्डर्स स्वरूपात मिळाले आहेत. सध्याच्या प्रकल्पांमध्ये व्यावसायिक इमारती, इंडस्ट्रियल चिमणी आणि डेटा सेंटर्सचा समावेश आहे, जे रोहन बिल्डर्सच्या मजबूत इंजिनियरिंग क्षमता दर्शवतात.

रियल इस्टेट क्षेत्रात रोहन बिल्डर्सने पुणे आणि बंगळूर या शहरांमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त गृहप्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्यामध्ये उंच इमारती, व्हिला, बंगले, रो-हाऊस तसेच मोठ्या टाऊनशिप्स चा समावेश आहे.

वरील सर्व क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त करूनही रोहन बिल्डर्ससाठी ‘ग्राहकांचे समाधान’ हाच सर्वोच्च पुरस्कार आहे.

क्रिसिल ही एक अग्रगण्य जागतिक विश्लेषण कंपनी आहे जी जागतिक बाजारपेठचे मूल्यमापन करून मार्केटला अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहित करते. रेटिंग, डेटा, संशोधन, विश्लेषणे आणि सोल्यूशन्स प्रदान करणारी आघाडीची कंपनी आहे. मार्केट मधील उतार चढाव, बदल आणि मजबूत ट्रॅक रेकॉर्ड चा अभ्यास करण्यात क्रिसिलने जागतिक ठसा उमटवला आहे. क्रिसिलने भारत, USA, UK, अर्जेंटिना, पोलंड, चीन, हाँगकाँग, UAE आणि सिंगापूर येथून कार्यरत असलेल्या व्यवसायांद्वारे १,००,००० हून अधिक ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शना द्वारे कृती करण्यायोग्य कार्यक्षम उपाय दिले आहेत.

क्रिसिल S&P Global Inc च्या मालकीचे आहे, जे जगभरातील भांडवल आणि कमोडिटी मार्केटला पारदर्शक आणि स्वतंत्र रेटिंग, बेंचमार्क, विश्लेषणे आणि डेटा प्रदान करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...