Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेअर बाजारासाठी संयम व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी-सीए चरणज्योत सिंग नंदा

Date:

‘आयसीएआय’तर्फे शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे: “शेअर बाजारात चढ-उतार होत राहतो. बाजार अचानक उसळी घेतो, तर अचानक कोसळतो. हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम, सामंजस्य व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) केंद्रीय उपाध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले.
‘आयसीएआय’च्या कमिटी ऑफ फायनान्शियल मार्केट्स अँड इनवेस्टर्स प्रोटेक्शन (सीएफएमआयपी) आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए नंदा यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सीएफएमआयपी’चे चेअरमन सीए दुर्गेश काबरा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिनीयार, परिषदेचे समन्वयक सीए जितेंद्र खंडोल, सहसमन्वयक सीए सर्वेश जोशी, आयसीएआय पुणेचे सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेत ४०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, गुंतवणूकदार, व्यावसायिक, आर्थिक सल्लागार व इतर इच्छूकांनी सहभाग नोंदवला. 
सीए चरणज्योत सिंग नंदा म्हणाले, “शेअर बाजारात येताना केवळ पैसे कमवण्याचा दृष्टिकोन असू नये. भावनांवर संयम असावा. नुकसान झाले, तर खचू नये आणि लाभ झाला, तर हुरळून जाऊ नये. शेअर बाजाराची रचना समजून घेऊन वास्तवात जगावे. शिस्त पाळण्यासह शेअर बाजारातील आपला उद्देश नेमका काय, हे निश्चित करावे.”

सीए दुर्गेश काबरा म्हणाले, “आज देशभरात १ लाख ६० हजार प्रॅक्टीस करणारे सीए आहेत. शेअर बाजारात सीएसाठी विविध संधी आहेत. शेअर मार्केटचा अभ्यास करावा. यात येण्यासाठी ठराविक वेळ नाही. लाभाची अपेक्षा असते, तशी नुकसान सहन करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सामान्य माणूसही शेअर बाजारात पाऊल ठेवत आहे. आर्थिक बाबतीत भारत प्रगतीपथावर असल्याने भारतासह विदेशातील गुंतवणूदारही गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक, प्रक्रिया यामध्ये सीए मार्गदर्शक म्हणून महत्वाचा ठरतो.”
सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार यांनीही आपले विचार मांडले. सीए व्यावसायिक, विद्यार्थी, आर्थिक क्षेत्राशी संबंधित घटकांना मार्गदर्शक अशा उपक्रमांचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात येत असल्याचे सीए अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनीयार यांनी आभार मानले.
दोन दिवसीय परिषदेत विचारमंथन-शेअर मार्केटवरील या दोन दिवसांच्या परिषदेत सीए चरणज्योत सिंग नंदा यांच्या बीजभाषणानंतर सीए जितेंद्र खंडोल यांनी ‘वेल्थ क्रिएशन थ्रू ट्रेडिंग इज एन आर्ट’, मितेश ठक्कर यांनी ‘ब्रेकआऊट गॅप्स’, देवेन चोक्सी यांनी ‘वेल्थ क्रिएशन थ्रू लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट’, जीवन पटवा यांनी ‘स्पॉटिंग मल्टिबॅगर्स अँड रायडींग ऑन इट’, सीए अनुराग गोयल यांनी ‘आयपीओ फंड रेजिंग’ यावर मार्गदर्शन केले. सीए विक्रम कोटक व सीए अनिल सिंगवी यांचा ‘इन्व्हेस्टमेंट की पाठशाला : सीए इज इन्व्हेस्टमेंट गुरु’ यावर विशेष कार्यक्रम झाला. सीए सिद्धार्थ व्होरा, सीए आशिष बाहेती यांचीही माहितीपर सत्रे झाली. ‘प्रादेशिक राजकारण, निवडणूक आणि त्याचा इक्विटी मार्केटवर होणार परिणाम’ यावर चर्चासत्र झाले. यामध्ये नितीन धर्मावत, जयदीप मराठे, सीए प्रकाश खंडेलवाल, सीए मोशमी शहा यांनी सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...

विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी, ७ विधेयके सादर

नागपूर - विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी...

सातव्या दिवशीही 200+ उड्डाणे रद्द:सर्वोच्च न्यायालयाचाही याचिकेवर सुनावणीस नकार

मुंबई- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण सोमवारी...