Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दरवर्षी पाऊस काढतो महापालिका कारभाराचे वाभाडे .तरीही पालिकेला ….जरासी XXX वाटेना

Date:

संदीप खर्डेकर यांचे आता नव्या आयुक्तांना साकडे

पुणे-महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने आणि आपत्ती पूर व्यस्थापन विभागाने कायमचीच XXX सोडून दिली आहे कि काय ? असा प्रश्न पडावा असे चित्र आहे .नेहमीप्रमाणे याही वर्षी पावसाने पहिल्याच पावसात महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि याही वर्षी आता नव्या आयुक्तांना भाजपचे जुने जाणते ,डॅशिंग अशी प्रतिमा असलेले कार्यकर्ते ,प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पत्र दिले आहे. त्याबरोबर मागच्या वर्षी पावसाने काढलेल्या वाभाड्फोयांचेटो देखील पाठविले आहेत . आता नवे आयुक्त काय भूमिका घेतील आणि कोणती यशस्वी कार्यवाही करतील ते येणारा कालच सांगेल पण खर्डेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे ते पाहू या …

खर्डेकर यांनी असे म्हटले आहे कि,’ गेल्या आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसाने शहरातील अनेक भागात दैना उडविली. अनेक ठिकाणी पाणी साचले व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यामुळे नाले सफाई, पावसाळी लाईन व ड्रेनेज लाईन (गटार) सफाई चे वास्तव तर उघडे पडलेच पण त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण व्यवस्थित समतोल न झाल्याने व काही अंशी सिमेंट काँक्रिट च्या रस्त्यांमुळे तळं साचलेले दिसले.येथे पाण्याचा निचरा होण्यास 2/3 दिवस लागले. तरी शहरातील अशी ठिकाणं शोधून तेथे त्वरित उपाययोजना केल्यास येणारा पावसाळा पुणेकरांना सुखावह जाईल.
तसेच गत वर्षी अश्याच पडलेल्या मुसळधार पावसाने ( अवघ्या काही तासात ) शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. कर्वेनगर / एरंडवणे भागात तर अनेक इमारतीत पाणी शिरले व स्वतः आयुक्त विक्रमकुमार यांना सर्व अधिकाऱ्यांसमवेत रात्री उशिरापर्यंत येथे थांबून रहावे लागले व स्वतः पाणी निचऱ्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्या लागल्या.त्यावेळी ही त्रुटी लक्षात आली की पाणी निचरा करण्यासाठी प्रशासनाकडे पुरेशी साधने नव्हती / पंप नादुरुस्त होते व येवढे पाणी उपसण्याची त्यांची क्षमता नव्हती. तरी खालील मागण्या करत आहे, त्याची दखल घेऊन सकारात्मक पावले उचलला अशी खात्री वाटते….
आपत्ती व्यवस्थापने साठी लागणारी सर्व साधन सामग्री सर्व क्षेत्रीय कार्यालयात त्वरित उपलब्ध करावी.
तसेच एका संस्थेने (बहुधा प्रायमूव्ह) शहरातील सर्व पावसाळी व ड्रेनेज लाईन्स चे मॅपिंग केले आहे. त्याचा अभ्यास करावा म्हणजे ऐन वेळी कुठे पाणी अडकले आहे हे शोधत बसण्याची नामुष्की टाळता येईल.
शासनाने काही ठिकाणी नाल्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे, नाल्यांची सफाई, खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधी मंजूर केला असून सदर निधी प्राप्त झालाय का व त्याचा विनियोग कसा करत आहात याचा तपशील जाहीर करावा.
तसेच नालेसफाई वेगात पूर्ण करावी व त्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेमार्फत मागवावा म्हणजे वर्षानुवर्षे नालेसफाई, ड्रेनेज व पावसाळी लाईन सफाई चा कोट्यावधीचा निधी पाण्यात तर वाहून गेला नाही ना ह्या पुणेकरांच्या शंकेचे निरसन होईल.

खर्डेकरांनी आपल्या मागण्या पुन्हा एकदा महपालिका आयुक्तांच्याकडे मांडल्या आहेत . पण शहरात आणि परिसरात पाणी वाहून जाणारी यंत्रणा कशामुळे असफल होते आहे हे सर्वांना ठाऊक आहे ,पथ विभाग आणि ड्रेनेज विभाग यास सराव्धिक कारणीभूत मानला जातो तशीच बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे देखील यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत . सिमेंटचे रस्ते , गल्ली बोळाचे कॉंक्रीट करण,ओढे नाल्यांची मुस्कटदाबी, निसर्गावर होणारे मानवी हल्ले आणि त्यास महापालिका अधिकाऱ्यांची मिळणारी साथ यामागे कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करा; शासन तुमच्या पाठीशी आहे— डॉ. नीलम गोऱ्हे”

चंद्रपूर, दि. ११ : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना...

जलसंधारण खात्याचा आकृतीबंध न उठल्यास संजय राठोडांना छत्रपती संभाजीनगरात प्रवेशबंदी!

वाल्मी येथील रोजगार सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा छत्रपती संभाजीनगर :राज्यातील लाखो...

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना सोईसुविधा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️ _विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे...

पुणे महापालिका निवडणूक :मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना अर्ज वाटप आणि स्वीकृती

पुणे महानगर पालिका निवडणूक २०२६ साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने...