मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

Date:

मुंबईदि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा मतदारसंघात ‘महिला संचालित मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत. महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात येत आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघात मिळून एकूण ११ सखी मतदान केंद्रे असणार आहेत. ११ सखी मतदान केंद्रापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ६ तर मुंबई दक्षिण मतदारसंघात ५ सखी मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असून धारावी मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत. भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मतदान केंद्र क्रमांक १०० आणि धारावी ट्रान्सलेट कॅम्प मनपा शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक ८२ ही धारावी मतदारसंघातील दोन सखी मतदान केंद्र असणार आहेत.

सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. स्त्री – पुरुष समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले आहे. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात येते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इस्त्रायलने गाझामध्ये प्रतिबंधित व्हॅक्यूम बॉम्ब टाकले,हजारो लोक वाफ होऊन गायब झाले:आरोप

युद्धाला अडीच वर्षे उलटली, गाझाचे खंडहर झाले-हमासच्या हल्ल्याने सुरू...

सोलापूर आणि कोल्हापूर दरम्यान नियमित इंटरसिटी ट्रेन सेवा

मुंबई- सध्या सोलापूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) विभागातील प्रवाशांच्या गरजा...

 172 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट फसवणूक रॅकेट उघडकीस

मुंबई- सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) आणि केंद्रीय उत्पादन...