Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कामावर असलेल्या तरुणीला बिअर पाजून बलात्कार: मार्केटयार्ड मधील प्रकार -प्रवीण बंब ला पकडले

Date:

पुणे- आपल्याआईचा सांभाळ करण्यासाठी केअरटेकर म्हणून घरी कामाला असलेल्या तरुणीवर बिअर पाजून बलात्कार करणाऱ्या शेअर मार्केट व बांधकाम काॅन्ट्रक्टर ची कामे करणाऱ्या प्रवीण बंब याला पोलिसांनी अटक केली आहे. मार्केट यार्द परिसरातील आपल्या राहत्या घरी आणि खडकवासला येथील लॉज वर या भामट्याने हि कृत्ये केल्याचे पोलिसांनी सांगितले .

आई-वडील व आजीच्या निधनानंतर आपल्या मामाकडे राहणाऱ्या एका केअरटेकर तरुणीवर बिअर पाजून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणीचे आई-वडिलांचे अपघातात निधन झाले होते. त्यानंतर तिचा सांभाळ आजी करत हाेती. परंतु काेराेनात आजीचे देखील निधन झाल्याने तिचा सांभाळ चुलत मामा करु लागला. यादरम्यान, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात एका कुटुंबातील महिलांचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकरची नाेकरी एजन्सीच्या माध्यमातून स्विकारली. मात्र, सदर कुटुंबातील व्यक्तीने तिला जबरदस्तीने एका लाॅजवर नेऊन मारहाण करत बिअर पाजली आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

याबाबत पिडित तरुणीने स्वारगेट पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आराेपी प्रवीण बंब (वय-45, रा.मार्केटयार्ड, पुणे) यास पाेलिसांनी अटक केली आहे. सदरचा प्रकार एप्रिल 2024 ते 11 मे 2024 दरम्यान सिंहगड राेड खडकवासला धरणाच्या पुढील एका लाॅजमध्ये व आराेपीच्या राहत्या घरी घडला.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रवीण बंब हा शेअर मार्केट व बांधकाम काॅन्ट्रक्टरची कामे करताे. त्याची आई आजारी असल्याने घरी बेडवर झाेपून असते, तर पत्नी देखील आजारपणाने ग्रस्त आहे. त्यामुळे आईचा सांभाळ करण्यासाठी त्याने एका केअर टेकर एजन्सीशी संपर्क साधून पिडित तरुणीला कामासाठी 4 महिन्यापूर्वी ठेवले हाेते. मात्र, आराेपीने घरी पत्नी नसताना, तिला हाताला धरुन ओढून जबरदस्तीने त्याच्या बेडरुममध्ये नेऊन तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत काेणाला काही सांगू नकाे नाहीतर तुझा गळा दाबून तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली.त्यानंतर पुन्हा आरोपी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला चल आपण मस्त मज्जा करु, असे म्हणाला. त्यावर तरुणीने तुम्ही माझ्या वडिलांसारखे असून, तुम्हाला माझ्यासारख्या मुलीही आहेत, तरीही तुम्हाला असे बोलण्यास लाज वाटत नाही का? असे प्रत्युत्तर दिले. यामुळे आरोपीने तरुणीला कारमध्ये बस नाहीतर मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिला घेऊन तो सिंहगड रोडने खडकवासला धरणाच्या पुढे एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिला बिअरही पाजली. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवे मारेन अशी धमकीही दिली. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलिस करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...