Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अजित दादा तुम्ही शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला- डॉ. अमोल कोल्हे

Date:

शिरुर : शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. अजित दादा तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला नसेल. म्हणूनच तुम्ही आरोप करताय मी खोटा इतिहास दाखवला. पण पुरोगामी विचार हा कायम व्यवस्थेला प्रश्न विचारत आला आहे. हे प्रश्न विचारले म्हणूनच छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मला जनतेसमोर मांडता आला. पण तुम्ही जो आरोप केला त्यामुळे
शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिल.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ  शिरुर मध्ये जेष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली. या सभेलाप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख,माजी मंत्री राजेश टोपे, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे, आमदार अशोकबापू पवार, आ. रोहित पवार, उत्तमराव जानकर, नितेश कराळे, सुजताभाभी पवार, काकासाहेब पलांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, देवदत्त निकम, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

बारामतीची निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकलाय. यावेळी जाहीर सभांमध्ये अजित पवार हे डॉ. कोल्हे यांच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. या टिकेला डॉ. कोल्हे यांनी जाहीर सभेतून चोख प्रत्युत्तर दिल.

डॉ. कोल्हे म्हणाले की, योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं. बारामतीतुन काही पाव्हणे आलेत, बारा बारा सभा घेतायेत, आता कळल त्यांचे प्रदेशाध्यक्ष येतायेत. एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला सगळे राष्ट्रीय नेते एकत्र आलेत.  अजित पवारांविषयी माझ्या मनात आस्था आहे, पण 27 जून 2023 पूर्वीच्या अजित पवारांविषयी आस्था आहे. 27 जूनला भोपाळ मध्ये पंतप्रधानांच भाषण झालं त्यानंतर त्यांचा कढीपत्ता कसा झाला. बारामतीच मतदान झालं, उमेदवार निवडून येत नाही असं दिसलं, लगेच शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली
मी आत्तापर्यत ऐकलं होतं, कार्यकर्त्यांच्या मनात भावना असते कढीपत्ता होण्याची इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पण भाजप तेच करतोय का हा प्रश्न पडतोय.

खासगीतल्या गोष्टी सांगायला लागलो तरी खूप काही सांगता येईल

अजित पवार हे सातत्याने खासगी मध्ये झालेल्या गोष्टी जाहीर करत आहेत. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना थेट इशाराच दिलाय. दादा, आजकाल खासगीतल्या गोष्टी बोलायला लागलेत, पण अशा गोष्टी बोलायला बसलो तर मग अनेक गोष्टी निघतील. अस म्हणत कोल्हे म्हणाले की, दादा सगळीकडे सांगत आहे, अमोल कोल्हे राजीनामा देण्याचं सांगत होते, मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना, मी समोर कधी बोललोय का? पण आदरणीय दादा तुम्हाला टीव्हीवर भावुक होऊन राजीनामा देतो आणि शेती करायला जातो हे सांगताना आम्ही बघितल आहे. खासगीतलच बोलायचं असले तर ज्या भाजपची तळी घेऊन एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला येताय. पण  याच भाजपने जेव्हा तुम्ही सभागृहात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराजरक्षक म्हणाला होता, त्यावेळी जोडा मारा आंदोलन केले होते.
राज्यभर भाजप तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होत, तर आत्ता जे तुमच्या जे खांद्याला खांदा लावून पळतायेत ते सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्या तुमच्या वतीन भांडलाय, आणि याच पठ्याने व्हिडीओ करुन सांगितलं स्वराज्यरक्षकच आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे. दादा, भूमिका बदली तर खासगीतल्या अश्या अनेक गोष्टी बाहेर निघतील, हा व्हिडीओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगाव, माझ्या 35 वर्षाचा कारकिर्दीत माझ्या प्रतिमेला कोणी जोडे मारले नव्हते ही व्यथा कोणी बोलून दाखवली होती हे ही जाहीरपणे सांगाव अस प्रति आव्हान देते ,  महत्वाच्या गोष्टींवर बोलू, आपण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करत आहात हे एकदा मनाला विचारा असही डॉ. कोल्हे म्हणाले.

बिबट्या च्या हल्ल्यात ८ वर्षाच्या मुलाचा मृत्य झाल्या नंतर अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हे भावूक झाले..चिमुकल्याच्या संवेदना व्यक्त करताना अमोल कोल्हेंच्या डोळ्यात अश्रृ आले. डॉ. कोल्हे म्हणाले की, नम्रपणे दादांना आव्हान करु इच्छितो, जुन्नर तालुक्यात जाताय, तर काल एका आठ वर्षाच्या बळी बिबट्याच्या हल्ल्यात झालाय. त्या लेकराच्या माऊलीला भेटा. काही दिवसांपूर्वी तुम्ही इथं आला होता, तेव्हा टिंगलीच्या स्वरूपात म्हणाला होता नसबंदी झाली की सरकार गडगडत. आता आठ वर्षाच्या लेकराच्या आईच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही हेच बोलणार आहात का असा सवाल केला.मी बिबट प्रजनना नियंत्रण करण्यासंदर्भात वन अधिकाऱ्यांना भेटलो होतो,  त्यांनी आदेश दिले, पण महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री हे तिकीट वाटपात बिझी असल्याने जुन्नर वन विभागाने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही. एवढा निधी देतो तेवढा निधी देतो, तर त्या निधीतुन बनवलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर जर आमच्या पोरांच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील तर तो निधी चाटायचा आहे का? हा संतप्त सवालही केला. तुम्ही सांगता पाहिजे तेवढा पिंजरे देतो, 20 पिंजरे आलेत, 500 बिबटे आहेत. तुम्ही सांगता ना मोठे नेते आहेत तर दिवसा थ्री फेज लाईट देऊन दाखवा ना असे आव्हान दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...