मतदान वाढीसाठी सहकार विभागाचा विशेष प्रयत्न

Date:

पुणे, दि. ८ : जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभेसाठी येत्या १३ मे रोजी मतदान होणार असून शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रथमच ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थांमधील मतदान वाढीसाठी लेखापरीक्षकांची मदत घ्यावी. गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान चिठ्ठी पोहोचविण्यास मदत करावी, मतदानाच्या तारखेचा उल्लेख असलेली निवडणूक विषयक भित्तीपत्रके संस्थेच्या दर्शनी भागात लावावीत, सभासदांना मतदार यादीत नाव शोधून देणे, पात्र मतदारांची यादी तयार करुन मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान केलेल्या मतदारांची नोंद घ्यावी अशा सूचना श्री.राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करणे, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...