इंडिया आघाडीचे सरकार येताच जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.
जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार
राहुल गांधींनी मिडीयाच्या मालकांना केले लक्ष्य– मिडीया कितीही ओरडू दे… आम्हाला कितीही शिव्या देऊदेत… आम्हाला फरक पडत नाही. -पत्रकारांना कुटुंब आणि रोजी रोटीची चिंता -पत्रकारांच्या मध्ये देखील किती मागे राहिलेल्या जातींचे प्रतिनिधित्व हेही लक्षात घ्यावे लागेल असे म्हणाले राहुल गांधी .
कोरोना काळात व्हॅक्सीन तयार करणारी कंपनी मोदींना इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे देत होती.का देत होतीं मोदींच्या पार्टीला पैसे हे समजून घ्या म्हणाले राहुल गांधी
पुणे-नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतील, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतील, त्यांनी राजकारणाची गंमत लावलीय, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला. तसेच,ज्येष्ठ नेत्यांवर आणि शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या टीकेवरुनही राहुल गांधींनी पलटवार केला. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांबद्दल उलटसुटल बोलत आहेत. पंतप्रधान पदाची गरिमा ठेवली नाही. पंतप्रधानांनी विकासाची, देशाची बात केली पाहिजे, शेतकऱ्यांवर बोललं पाहिजे. पण, शरद पवारांवर बोललं म्हणजे लोकांना आवडेल असं त्यांना वाटतं का, असा सवालही राहुल गांधींनी पुण्यातून विचारला आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, राहुल गांधी यांनी पुणे जिल्हयातील महायुतीचे चार उमेदवार सुप्रिया सुळे(बारामती),रवींद्र धंगेकर(पुणे), अमोल कोल्हे(शिरूर) आणि संजोग वाघेरे पाटील(मावळ) यांच्या प्रचारार्थ आज दि. (3 मे) रोजी पुणे येथे आले होते. यावेळी महासचिव रवि चेन्नीथ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,रमेश बागवे,मोहन जोशी ,आबा बागुल,अरविंद शिंदे , संग्राम थोपटे, रजनी पाटील, अजित दरेकर, दीप्ती चौधरी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेतून शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता, त्याच पुण्यातून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलणं हे पंतप्रधानांना शोभतं का, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.
संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थान मधील वंचित, आदिवासी आणि अल्पसंख्याक लोकांना अधिकार मिळाले ते काढून घेणे प्रयत्न केले जात आहे.संविधान गायब झाले तर हिंदुस्थान ओळख राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जी देणं दिली ते आम्ही संपुष्टात आणून देणार नाही, असे मत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
गांधी म्हणाले, आरक्षण संपवण्याचा भाजपचा कट आहे. जे आरक्षणसाठी ५० टक्के कृत्रिम मर्यादा लावली आहे ती संपवणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही सभेत जाहीर करावे. निवडणूक नंतर आम्ही सत्तेत आल्यास हे काम करणार आहे. देशात १५ टक्के दलित, आठ टक्के आदिवासी आणि ५० टक्के मागासवर्गीय असे ७३ टक्के लोक आहे. देशात महागाई, गरिबी, बेरोजगारी, इंधन दरवाढ आहे मात्र, प्रसारमाध्यमे ते दाखवत नाही ,काही बोलत नाही. हजारो कोटींची निवडणूक रोखे भ्रष्टाचार झाला आहे पण त्याबाबत मीडिया गप्प आहे. मोदी हे पारदर्शक काम करत आहे तर देणगीदार यांची नावे लपवून का ठेवण्यात आली. देणगीदार कंपन्या यांना टेंडर मिळत आहे.
जनतेसमोर नरेंद्र मोदी भ्रष्टाचार करत आहे. त्यांनी १६ लाख कोटी रुपये २२ उद्योजक यांचे कर्जाचे माफ केले आहे. त्यांच्याजवळ देशातील ७० टक्के जनता इतके धन आहे. ९० टक्के लोक मनरेगा , कंत्राटी कामे करत आहे, त्यांची देशात कुठे भागीदारी दिसत नाही. दलित, आदिवासी यांचे प्रधिनित्व कुठे दिसत नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाल्यास कसे जनतेला मूर्ख बनवले जात आहे समजून येईल. त्यानंतर नवीन राजनीती सुरू होईल.मी जतिगणाना गोष्ट करण्यापूर्वी ते ओबीसी स्वतःला सांगत होते. पण त्यानंतर ते देशात जाती नाही सांगत आहे. मागील दहा वर्षात मोदी यांनी २२ लोकांना फायदा दिला आहे. विविध उद्योग खासगीकरण करण्यात आले आहे.
- मी जेव्हापासून जातनिहाय जनगणनेची मागणी करू लागलो तेव्हापासून मोदी म्हणू लागले की या देशात दोनच जाती आहेत एक श्रीमंत आणि एक गरीब.
- अचानक ते ओ बी सी असल्याचा दावा करतायत.
कॉंग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही उठवू… ज्यामुळे मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल. - कॉंग्रेस सत्तेत आल्यावर भारतातील गरीबांची यादी आम्ही तयार करु. त्या महिलेच्या अकांटमधे आम्ही वर्षाला एक लाख रुपये जमा करू.
कॉंग्रेस सत्तेत आल्यावर जी एस टी संपवून टाकू - नोकरी करणार्रा महिला घरी येऊन डबल ड्युटी करतात… अशा महिलांच्या खात्यात कॉंग्रेस एक लाख रुपये जमा करेल.
- अंगणवाडी सेविकांचे वेतन आम्ही दुप्पट करू.
कॉंग्रेस सत्तेत आल्यावर शेतकर्यांचे कर्ज माफ करू - कॉंग्रेस सत्तेत आल्यावर अग्नीवीर योजना रद्द करू.
- शेतकर्रयास्ठी कर्ज माफी कमिशन तयार करू.
- मिडीया जेवढा ओरडेल तेवढे मला वाटेल की मी योग्य काम करतोय
- कॉंग्रेस सत्तेत आल्यावर युवकांना पहिल्या वर्षभराच्या नोकरीची हमी देणार आणि विद्यापीठात शिकणार्या तरुणांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करणार.
- रेवण्णाने 400 महिलांचा बलात्कार केलाय. बी जे पी च्याच आमदाराने ही गोष्ट गृहमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र तरिही मोदींनी अशा व्यक्तिंसाठी मते मागितली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्रात पाण्याखाली जाऊन ड्रामा करतात. मोदी पाण्याखाली घाबरले होते.
- नरेंद्र मोदींनी शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याचा अपमान करतात.
- महाराष्ट्र कॉंग्रेस विचारधारेचे राज्य आहे.
पेपर लिक करणार्यांना कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कडक कायदा करू.*नोकर भरती आम्ही खाजगी कंपन्यांकडून बंद करू.

