सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : शरयू रांजणे, सानिका बागळे, अरुंधती कंवर यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या तिसऱ्या फेरीत शरयू रांजणेने समनव्या धनंजयवर २१-६,२१-६ असा, सानिकाने शिवानी मासळेकरवर १४-२१,२१-१३,२१-१६ असा विजय मिळवला. यानंतर अरुंधतीने आयुषी काळेवर २१-९, २१-१७ असा सहज विजय मिळवला. सानवी पाटीलने अपूर्वा घोळवेचे आव्हान २२-२०, १५-२१, २१-१३ असे परतवून लावले. शर्वरी सुरवसेने सई जोशीचा २१-८, २१-१६ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील दुस-या फेरीत पार्थ झालवडिया याने अमेय जोशीवर २१-१९, २१-१५ अशी मात केली. यानंतर दुसऱ्या मानांकित ओजसने आर्यन टोरोवर २१-१०, २१-६ असा सहज विजय मिळवला.
निकाल – ११ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – वरद आठल्ये वि. वि. तनिष अनपट २१-१४, २१-१३, वेदांत मोरे वि. वि. लक्ष्य सिन्हा २१-५, २१-११, कृष्णा सावंत वि. वि. २१-९, २१-३, ईशान रॉय वि. वि. कबीर तांबे ११-२१, २१-१४, २१-१५, अमन वर्मा वि. वि. अर्निश काटोरे २१-९, २१-२.
११ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – दिविशा सिंग वि. वि. ओवी वायळ २१-३, २१-१०, तेजस्वी दरेकर वि. वि. स्वरा कुलकर्णी २१-८, २१-१०, राजलक्ष्मी थेउरकर वि. वि. अन्वी कुलकर्णी २१-१८, २०-२२, २१-१३, पूर्वा हांडे वि. वि. स्वरा पांडे २१-१२, १८-२१, २१-१२, अग्रिमा राणा वि. वि. शुभ्रा मासळेकर २१-३, २१-५, निधी गायकवाड वि. वि. केयारा साखरे २१-८, २१-१५, वल्लरी वाटणे वि. वि. शनया राजवाडे २१-१०, २१-१३.
१५ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – विराज सराफ वि. वि. अद्वय यार्डी २१-९, २१-८, विहान कोल्हाडे वि. वि. विघ्नेश सुतार २१-१४, २१-१५, आरुष सापळे वि. वि. सौरिष काने २१-११, २१-१९, जतिन सराफ वि. वि. आदित्य पोतनिस २१-८, २१-१५, तनिष्क अडे वि. वि. शिवेंद्र पवार २१-४, २१-०, रोहन सायनकर वि. वि. अतिक्ष अगरवाल २१-१०, १६-२१, २१-१५, अयांश यारगट्टी वि. वि. नयन भामरे २१-१५, २१-१७, अजिंत्य जोशी वि. वि. दिव्यान कौशिक २१-११, २१-११, चिन्मय फणसे वि. वि. जयंत झाडे २१-९, २१-१५, अनय एकबोटे वि. वि. प्रथमेश जगदाळे २१-१६, २१-१२, अक्षर झोपे वि. वि. अर्णव राणे २१-८, २१-११, आरुष अरोरा वि. वि. महिराज सिंग राणा २०-२२, २१-१९, २१-१२, ध्रुव बर्वे वि. वि. अक्षित तरडलकर २१-८, २१-७, समीहन देशपांडे वि. वि. सिद्धार्थ पनिस्कर २१-१८, १८-२१, २१-१४.
१९ वर्षांखालील मुली – पहिली फेरी – संस्कृती जोशी वि. वि. हृदया साळवी २१-१०, २१-१२, यशस्वी काळे वि. वि. खुशी सोमवंशी २१-४, २१-१, जिया उत्तेकर वि. वि. नेहा गाडगीळ २१-७, २१-५, राधा गाडगीळ वि. वि. शांभवी कुरळे २१-४, २१-१, पीयूषा फडके वि. वि. मिताली इंगळे २१-१९, २१-१४, सिया बेहेडे वि. वि. अनुष्का जयस्वाल २१-६, २१-१६, सायुरी थोकल वि. वि. रिया गाडगीळ २१-८, २१-८.

