शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाड येथे घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. केवळ पायलटच त्यामध्ये होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप समजले नाही.आज सकाळी 9.30 च्या सुमारास सुषमा अंधारे महाड येथून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. पण अचानक हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना कोसळले. यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.सुषमा अंधारे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत. महाड येथून त्या बारामती येथे हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. हेलिकॉप्टर हे साधारण सकाळी 9 च्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे पंखा तसेच इतर महत्वाच्या भागांचे तुकडे झाले.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारेंसह पायलट सुखरुप
Date:

