लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Date:

देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी नागरिकांनी कर्तव्ये पार पाडावीत
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांचे प्रतिपादन

पुणेभारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले.

भारतीय लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व ‘माणिकचंद ग्रुप’च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उप विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रांत नाईक हे यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अजय कुमार सिंग म्हणाले की, ‘‘संविधान उद्यान चौकाचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. जगात भारताचे संविधान विशेष असे आहे. ज्यांनी संविधानाची कल्पना मांडली आणि ते तयार केले हे अत्यंत महत्त्वाचे काम होते. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. बदल्यात परिस्थितीनुसार त्यात बदल झाले हेही महत्वाचे आहे. या संविधानात आपल्याला मुलभूत असे अधिकार दिले असून त्यात आपल्या कर्तव्यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत. असे केले तर २०४७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’’

भारतीय सैन्य आणि प्रामुख्याने साऊथ कमांड यांच्याकडून पुणेकरांसाठी हे संविधान उद्यान उद्यान विशेष अशी भेट आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्या समजतील. तसेच संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असून त्यासाठी सिंग यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.

‘‘आपला देश ज्या संविधानावर चालतो. त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मुलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.’’

  • पुनीत बालन
    अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
    ————————————————-
    काय आहे संविधान उद्यानात?
    लष्कर भागात असलेल्या या संविधान उद्यानात भारतीय ससंदेच्या प्रतिकृत्तीवर राजचिन्ह असलेली तीन सिंहांची प्रतिकृती असून त्यावर संविधान लावण्यात आले आहे. तसेच उद्यानाच्या परिसरात संविधानातील नागरिकांची अकरा कर्तव्ये यांची माहितीही देण्यात आली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात भाजपच्या कॉंग्रेसभवन वरील हल्लाबोल आंदोलनासमयी दगडफेक: कार्यकर्त्यांसह पोलिस अन् पत्रकारही जखमी

पुणे-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती...

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...