परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई टाळण्यासाठी तोडपाणी- मोदी सरकारवर पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Date:

इंधनावर कर वाढवून ३६ लाख कोटी जनतेचे ओरबाडले

निवडणुक रोख्यातून जगातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप

पुणे: ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने

महाविकास आघाडीतील जागा वाटप ४८ पेकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे. मात्र आता निवडणुक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे, विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे , असेही‌ चव्हाण म्हणाले.

बागुल यांची नाराजी दूर होईल : थोरात

पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रश्नावर थोरात म्हणाले,  नाराज्यांकडे जाणे बोलणे, आमचे काम आहे, बागुल‌ यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

काळ्या पैशामध्ये मोदींचे तोडपाणी :

परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये  १५ लाख रुपये‌जमा करण्याचे आश्वासन देवून नरेंद्र मोदी २०१४ मध्ये‌ सत्तेवर आले. त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळ्या पैशाची‌ सर्व माहिती आली. आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे.  तरीही मोदी सरकारने आजवर संबंधीतांवर  कारवाई केला नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले आहे. इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू, असेही‌चव्हाण म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...