एअर इंडियाचे आयकॉनिक A350 दिल्ली-दुबई मार्गावर 1 मे पासून पदार्पण करणार

Date:

गुरुग्राम, दिल्ली-दुबई या अत्यंत रहदारीच्या मार्गावर आपले नवीन A350 विमान तैनात करण्याची घोषणा एअर इंडियाने गुरुवारी केली. यामुळे कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये या विमानाचे पदार्पण होईल.

1 मे 2024 पासून, दिल्ली आणि दुबई दरम्यान उड्डाण करणारे एअर इंडियाचे प्रवासी A350 चा अनुभव घेऊ शकतात. AI995/996 या नंबरने ओळखले जाणारे हे विमान दररोज रात्री 20:45 वाजता दिल्लीहून निघेल आणि रात्री 22:45 वाजता दुबईला पोहोचेल. तर परतीचे फ्लाइट दुबईहून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00:15 वाजता निघेल आणि आणि पहाटे 04:55 वाजता दिल्लीला पोहोचते. उड्डाण आणि पोहोचण्याच्या सगळ्या वेळा या स्थानिक वेळेनुसार असतील.

यासह, भारत आणि दुबई दरम्यान A350 हे विमान चालवणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी बनली आहे.

दिल्ली-दुबई मार्गावरील A350 विमानातील जागा एअर इंडियाच्या वेबसाइट, मोबाइल ॲपवर किंवा ट्रॅव्हल एजंटद्वारे आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

एअर इंडियाच्या A350 विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये पूर्ण-फ्लॅट बेडसह 28 खासगी सूट, प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुविधांसह 24 जागा तर इकॉनॉमी क्लासमध्ये 264 प्रशस्त जागा आहेत. A350 मधील सर्व सीट्सना आधुनिक Panasonic eX3 इन-फ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि HD स्क्रीन आहे. यामुळे जगभरातील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा जवळपास 2,200 तासांहून अधिक काळ आनंद घेऊ शकता.

एअर इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला A350s च्या वापरास सुरुवात केली. त्यांनी भारतामध्येच क्रू परिचय आणि नियम कळण्यासाठी विमाने उडवली आहेत.

दुबईला एअर इंडियाची सध्या आठवड्यातून एकूण 72 उड्डाणे आहेत. पाच शहरांमधून ही सेवा सुरू आहे. त्यापैकी 32 उड्डाणे दिल्लीहून आहेत.

दिल्ली आणि दुबईतील एअर इंडियाच्या A350 उड्डाणांचे वेळापत्रक
01 May 2024 पासून लागू
 
Flight No.Days of OperationSectorDepartureArrival
AI995दररोजदिल्ली – दुबई2045 Hrs2245 Hrs
AI996दररोजदुबई-दिल्ली0015 Hrs0455 Hrs
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...