खासदार बारणे यांच्या ‘हॅटट्रिक’चा खोपोलीतील महायुती कार्यकर्त्यांचा निर्धार

Date:

खोपोली, दि. 15 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विक्रमी मताधिक्यसह खासदार बारणे यांच्या हॅटट्रिकचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला.

खासदार बारणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना कार्यालयात शहर प्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड संघटक तात्या रिठे, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव, उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख हरेश काळे, सल्लागार अरुण पाटील, युवा सेनेचे जिल्हा सचिव सिद्धांत शेलार, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, उपशहर प्रमुख निखिल पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख मोहसीन शेख, कृष्णकांत विचारे, संपर्कप्रमुख प्रसाद वाडकर आधी पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाके वाजून खासदार बारणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरशेठ खंडेलवाल, विजय तेंडुलकर, हेमंत नांदे, शोभाताई काटे, डॉ. बबनराव नागरगोजे, रामू पवार, सुनील नांदे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

खोपोलीतील आतिकभाई खोत यांच्या घरी मुस्लिम बांधवांनी खासदार बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी अशपाकभाई लोगडे, निजाम जळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी यावेळी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.

माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, रामदास शेंडे तसेच इब्राहिम पाटील, यशवंत साबळे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदींची खासदार बारणे यांनी भेट घेतली. सर्व ठिकाणी बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...