आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Date:

पुणे,दि.१६ : शिरुर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त २ हजार २७३ क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत अवसरी येथील तंत्रनिकेतनच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दोन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना श्री. शिंदे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत माहिती दिली. कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक कामकाज अत्यंत जबाबदारीने पार पाडावे आणि कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकात सर्व संबधितांनी सहभागी व्हावे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यात येऊन मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडावे, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राबाबत उपस्थितींना माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत, अशी सूचना श्री.शिंदे यांनी केली. यावेळी सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे सादरीकरणाच्या माध्यमातून निरसन करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...

पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, मग त्यांच्याशी क्रिकेट खेळता कसे?:राष्ट्रभक्ती की ढोंग?

मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट...

टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी!:सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्वरित माफी मागा- CM देवेंद्र फडणवीस

नागपूर-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...