Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली-रवींद्र धंगेकर

Date:

पुणे-बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली. पुणेकरांना आता बदल हवा असून सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून देतील असा विश्वास महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले त्यात ते बोलत होते.

या प्रसंगी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणले की, काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीनाम्यात पाच न्याय व पंचवीस गॅरंटी अंमलात आणण्याचे वचन दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा हा लोकाभिमुख जाहीरनामा जनतेपर्यंत पोहचवावा.

  या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, देशाचे संविधान धोक्यात असून संविधान टिकले तरच या देशातील लोकशाही टिकेल त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणेकरांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची संविधान रक्षणाची भूमिका सांगावी.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, भाजपने पुणे मनपाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत प्रचंड भ्रष्टाचार केला असून या निवडणुकीत पुणेकर भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट पूर्ण ताकदीने व एकदिलाने या निवडणुकीत उतरली असून सामान्य जनतेसाठी धावून जाणारा माणूस म्हणून धंगेकर यांना पुणेकर नक्कीच भरभरून मतदान करतील.

काँग्रेसचे  जेष्ठ नगरसेवक चंदू कदम म्हणाले की, ही लढाई जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी असून यावेळेस कोथरूडकर मतदार धंगेकर यांच्या पारड्यात किमान एक लाख मते टाकतील.

     आशिष गार्डन येथे घेण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पृथ्वीराज सुतार,   योगेश मोकाटे,  लक्ष्मी दुधाणे, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, राष्ट्रवादी ब्लॉक उपाध्यक्ष गिरीश गुरुजानी, आम आदमी पार्टी ब्लॉक अध्यक्ष ॲड. अमोल काळे, प्रा. पवार सर, शिवसेनेचे नितीन पवार, पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस सागर सुबराव कदम, आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव डॉ. अभिजित मोरे ,  महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा मनीषा करपे, पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस नायना सोनार, पुणे शहर एन एस यु आय अध्यक्ष अभिजित गोरे, शिवा मंत्री, विजय खळदकर (उपाध्यक्ष), राजीव गांधी पंचायत शहर अध्यक्ष किशोर मारणे उपस्थित होते. कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी प्रास्ताविक केले, यशराज पारखी यांनी आभार व्यक्त केले.    

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...