पुणे-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप पक्षामध्ये येण्याचा जर त्यांचे मत बनले असेलतरकेंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल पण विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण, शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आणि त्यासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत जस की अशोक चव्हाण, अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे.जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी वारंवार सांगत आहे की केंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक-तुटक निर्णय होणार नाही.आमच्या राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल त्यानंतर मग कुठल्याही गोष्टीचा योग्य निर्णय घेतला जाईल.पण जर एकनाथ खडसे यांच भाजपामध्ये येण्याच मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल.एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? याबाबत ते म्हणाले, ग्रीन सिग्नलची गरजच नाही, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे.आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले आहे.त्यामुळे पक्ष प्रवेशाकरीता आमचा कुणाचीही ना नसते. एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी वारंवार सांगत आहे की केंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक-तुटक निर्णय होणार नाही.आमच्या राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल त्यानंतर मग कुठल्याही गोष्टीचा योग्य निर्णय घेतला जाईल.पण जर एकनाथ खडसे यांच भाजपामध्ये येण्याच मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? याबाबत ते म्हणाले, ग्रीन सिग्नलची गरजच नाही, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे.आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले आहे.त्यामुळे पक्ष प्रवेशाकरीता आमचा कुणाचीही ना नसते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला विरोध आहे का? याबाबत ते म्हणाले, खडसे यांचा पक्ष प्रवेशास कुणाचाही विरोध नाही.देवेंद्र फडणवीस यांचा पक्षप्रवेशाला विरोध नाही.देवेंद्र फडणवीस हे कधीही एकनाथ खडसे यांच्याविरोधात नाही.एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातील स्थान देवेंद्रनी पहिल्यापासून दिल आहे याचा मी साक्षीदार आहे.एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रना पूर्ण सहकार्य केले.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे यांचा सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात.देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाही.विनोद तावडे हे दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, राज्यात भविष्यात वेगळ काय पाहायला मिळेल का? यावर प्रतक्रिया देताना त्यांनी सांगितले, भविष्यात काही वेगळे नाही होत, आपणच वेगळा अर्थ करताय. आमच्या ज्या समित्या आहेत त्या समित्या निर्णय करतात त्यामुळे याची काही चिंता करयची गरज नाही.

