उमेदवारी अर्ज भरण्याबाबत प्राथमिक माहिती

Date:

उमेदवार किंवा सूचकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालन येथे देण्यात यावा. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतात. एक उमेदवार जास्तीत जास्त दोन मतदार संघातही अर्ज दाखल करु शकतात.  नामनिर्देशन पत्र भरताना  जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर च्या आत जास्तीत जास्त तीन वाहने उमेदवाराला आणता येतात. अर्ज दाखल करते वेळी केवळ ५ व्यक्ति उपस्थित राहू शकतात. उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराचा फोटो २×२.५ सेमी आकाराचा देण्यात यावा. ऑनलाईन डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज दाखल करण्याची सुविधा  ही ‘सुविधा’ या पोर्टल वर उपलब्ध आहे. त्यावर महिती आणि शपथपत्र अपलोड करता येऊ शकते. शपथ पत्र पूर्ण भलेले असावे.अपूर्ण असेल तर अर्ज रद्द होवू शकतो. नमुना c 1 ची वर्तमान पत्रातून प्रसिध्दी करावी लागते.मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी अर्ज ‘अ’ आणि ‘ब’  . भरणे आवश्यक  आहे. सर्वसाधरण प्रवर्गासाठी २५हजार रुपये,  व राखीव  प्रवर्गासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक. तीन फोटो. स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मान्यता नसलेल्या पक्षाच्या व अपक्ष  उमेदवार यांना १० सूचक आवश्यक आहे.  आणि हे सूचक त्याच मतदासंघांतील  रहिवासी असावेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...