सांताक्रुझ येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवरील शारिरिक अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

Date:

मुंबई दि.०१: सांताक्रुझ (प.) येथील एका शाळेत इयता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेत काम करणाऱ्या एका शिपायाने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दि. ३० मार्च, २०२४ रोजी उघड झाली आहे. सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असुन याची सखोल चौकशी होणे आवश्यक असून संबंधित आरोपीने या प्रकारचे कृत्य अन्य मुलींसोबत केले आहे का याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रधान सचिव शिक्षण विभाग, शिक्षण निरीक्षक मुंबई महानगरपालिका, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना निवेदनाद्वारे दिले आहेत.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे निर्देश दिले आहेत,

१) सदरच्या घटनेचे CCTV फुटेज व ईतर आनुषंगिक पुरावे पोलीस तपास अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात यावे.

२) पीडीत मुलगी व तिच्या कुटुंबियांचे शाळेतर्फे चांगल्या समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात यावे.

३)आरोपी शिपयास तात्काळ निलंबित करून त्यावर गुन्हा नोंद करावा. यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

४)शाळेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांचे चारित्र्य व सचोटी पोलीस यंत्रणेकडून तपासुन घेण्यात यावे.

५)सदरच्या घटना भविष्यात घडणार नाहीत याबाबत शाळेतर्फे करण्यात येणाऱ्‍या उपाययोजनाचा कृतिशील आराखडा सादर करावा.

६) पीडित मुलीला मनोधैर्य योजनेद्वारे मदत मिळवून द्यावी.

७) मुलींना शाळेत शिक्षण घेतांना सुरक्षितता वाटावी, त्यांना कुठलेही भय असू नये याबाबत तसेच त्यांच्या सुरक्षिततेकरिता करावयाची सर्वसमावेशक उपाययोजना याबाबत प्रधान सचिव शिक्षण विभागांतर्फे SOP (Standard Operating Procedure) बनविण्यात यावे व त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळामधुन करण्यात यावी.

या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल तात्काळ माझ्या कार्यालयास सादर करण्यात यावा असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ईश्वराला जाणून त्याच्या सतत जाणीवेतून आत्ममंथन शक्य आहे

-निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज सांगली, 25 जानेवारी, 2026: “ईश्वर...

स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन पुणे, दि....

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या...

केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा:महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांसह चौघांना पद्मश्री जाहीर, पहा पूर्ण यादी

मुंबई- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या प्रतिष्ठित...