Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सायबर गुन्हयाच्या आक्रमणांना रोखण्यास तंत्रज्ञान व समानतावादी विचारांची विधायक एकजुट गरजेची – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

६८ व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्र सहभागी; ऑनलाईन सत्रात अनेक मान्यवर तज्ञांचा सहभाग…

पुणे: जगभरातील नागरिकांसमोर जागतिकीकरणाचे मोठे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शाश्वत विकासामध्ये वाढ झाली आहे तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाल्यामुळे जगासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या विषयावर महाराष्ट्रातील सायबर विषयातील तज्ञ व अधिकारी मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षात झालेल्या सायबर गुन्ह्यांचा छडा महाराष्ट्रातील सायबर गुन्हे शाखेच्या वतीने यशस्वीरित्या लावण्यात आला असल्याचे मत स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

६८ व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पर्वात स्त्री पुरूष समानतेला सायबर गुन्ह्यांचे आव्हान’ या विषयावर शनिवार दि. १६ मार्च रोजी स्त्री आधार केंद्राने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी श्रीमती चांदनी जोशी काठमांडू, नेपाळ (लिंग समभाव विश्लेषक) या महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे, श्री. निलेश म्हात्रे (व्यवस्थापन व सायबर सुरक्षा तज्ञ) लिव्हींगस्टन न्यु जर्सी अमेरिका हे ‘महिला व सायबर गुन्हे,’
श्री संदीप प्रकाश गादिया ( सायबर क्राईम तपास तज्ञ, मुंबई) सायबर गुन्हे अन्वेषण व सायबर गुप्त वार्ता, बालसिंग राजपूत (सायबर क्राईम विशेष तज्ञ) मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी हे ऑनलाईन आर्थिक गुन्हे, ऑनलाईन लैंगिक छळ,
श्रीमती प्रणिती देशपांडे (हेग ,नेदरलँड) लिंग समभावा पुढील आव्हाने व सायबर गुन्हे, श्रीमती प्राची वॅन ब्रेण्डेनबर्ग कुलकर्णी (नेदरलॅंडस)या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पक्षपात व सायबर गुन्हे प्रतिबंध तज्ञ, श्रीमती जेहलम जोशी विश्वस्त, स्त्री आधार केंद्र, यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात, कृष्णा समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, प्रियदर्शिनी, विवेक पाटकर, वैभव कांबळे, शिरीष कुलकर्णी, राजश्री, मेखाला, सौम्याब्राता चक्रवर्ती, विभावरी कांबळे, संदीप गादीया, अंजुषा चौगुले यांसह अन्य मान्यवर ऑनलाइन सहभाग घेतला.

श्रीमती चांदनी जोशी काठमांडू, नेपाळ (लिंग समभाव विश्लेषक)यांनी महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे या विषयावर बोलताना सांगितले की, स्त्री विषयक काम करत असताना मानसिक चर्चा ही समाजातील मोठी समस्या असल्याचे निदर्शनास येत आहे तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमुळे माहिती उपलब्धतेचे स्त्रोत वाढत असल्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे या विषयावर बोलताना सांगितले की, स्त्री विषयक काम करत असताना तंत्रज्ञानामुळे स्त्रिया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिकार होत आहेत. ही समाजातील मोठी समस्या बनत असल्याचे निदर्शनास येत आहे. तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमुळे माहिती उपलब्धतेचे स्त्रोत वाढत असल्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही असल्याचे त्यांनी सांगितले. पण यातून मार्ग निघू शकतो असा विश्वास देखील त्यांनी दाखवला.

श्री. निलेश म्हात्रे (व्यवस्थापन व सायबर सुरक्षा तज्ञ) लिव्हींगस्टन न्यु जर्सी अमेरिका यांनी ‘महिला व सायबर गुन्हे,’या विषयावर बोलताना सांगितले की, अनेक नामांकित व्यक्तींना देखील सायबर गुन्ह्यांना सामोरे जावे लागले आहे. जर्मनी यु एस यांसह भारतामध्ये देखील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतीय बनावटीचे एअप्लिकेशन यावर उत्तम काम करत असल्याचे दिसत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच सायबर क्राइम घटक जोडण्यासाठी विद्यमान यूएन करारांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.तळागाळातील आणि स्थानिक पातळीवर क्षमता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. लोकांच्या खाजगी जीवनावरील आक्रमणाचा सामना व त्यांची सुरक्षा वाढवणे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री संदीप प्रकाश गादिया ( सायबर क्राईम तपास तज्ञ, मुंबई) यांनी सायबर गुन्हे अन्वेषण व सायबर गुप्त वार्ता, याविषयावर बोलताना सांगितले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीचे स्रोत वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमतेचा सुयोग्य वापर करून त्या माध्यमातून कंपन्या आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले .परंतु आपली फसवणुक होऊ शकते हे लक्षात धेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातील दक्षता याविषयी जनमानसात जनजागृती होणे हे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

बालसिंग राजपूत (सायबर क्राईम विशेष तज्ञ) मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी ऑनलाईन आर्थिक गुन्हे, ऑनलाईन लैंगिक छळ याविषयावर बोलताना सांगितले की, व्हाट्सएप, इमेल सोशल मीडिया साईट्सच्या माध्यामातून सायबर गुन्हे वाढत आहेत. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसेच भारत सरकार खूप चांगल्या पद्धतीने सायबर गुन्हे या विषयात काम करत आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रारी नोंदवून त्या खूप जलद गतीने सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सायबर क्राईम गुन्ह्यामध्ये आपला ओटीपी किंवा बँक डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नये असा सल्ला देखील यावेळी त्यांनी या चर्चासत्राच्या माध्यमातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती प्रणिती देशपांडे (हेग ,नेदरलँड) यांनी लिंग समभावा पुढील आव्हाने व सायबर गुन्हे, याविषयावर बोलताना सांगितले की, ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक सायबर विषयक उपक्रम राबविले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रमाण समाजात वाढत असल्याने लिंग सामानातेत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मानवनिर्मित बुद्धिमत्ता ही मर्यादित स्वरूपाचे काम करते तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही डेटा फोटो आणि असंख्य गोष्टी यामध्ये तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. .कृत्रिम बुद्धिमत्ता च्या माध्यमातून मोठ्या व्यक्तींचे व्हिडिओज ,फोटो फेक म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. यावर उपाययोजना करताना सक्षम सारखे माध्यम मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती प्राची वॅन ब्रेण्डेनबर्ग कुलकर्णी (नेदरलॅंडस)यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पक्षपात व सायबर गुन्हे प्रतिबंध तज्ञ याविषयावर बोलताना सांगितले की, सोशल मीडिया हाताळताना सायबर गुन्ह्यामध्ये आपण अडकले जाणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. पुरुष आणि स्त्री हे दोघेही सायबर गुन्ह्यांचे बळी पडताना दिसतात. यामध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, महत्वाच्या पदावरील व्यक्ती यांचे नावे समाज माध्यमांवर खोटे खाते उघडून त्याद्वारे सायबर गुन्हे घडविले जात आहेत. याबाबत सर्व नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तसेच सायबर सुरक्षाविषयक,भारतीय संविधान आणि लैंगिक समानता समानतेचा अधिकार कलमांतर्गत समाविष्ट आहे .सायबर स्वच्छता केंद्राच्या माध्यमातून कोड साफ करण्यासाठी प्रोग्राम आणि विनामूल्य तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती जेहलम जोशी विश्वस्त स्त्री आधार केंद्र यांनी सांगितले की, आजच्या परिसंवादाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सर्वांनी जाणून घेतले. यातून समोर आलेल्या माहितीत प्राविण्य सर्वांना होणे तेवढेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपाच्या शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या सत्रात सर्वांनी अभ्यासपूर्ण मांडणी तुन आलेल्या मुद्दयांवर आम्ही पाठपुरावा करणार आहोत . कृत्रिम बुद्धीमत्तेस शत्रु न मानता कृत्रिम बुद्धिमत्तेला सहकारी शक्ती मानुन त्याचा विधायक ऊपयोग करण्यास संवाद व समन्वय गरजेचा आहे. या चर्चासत्रामध्ये सर्व सहभागी मान्यवरांनी केलेले सादरीकरण अतिशय उपयुक्त व ज्ञानात भर पाडणारे आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. आगामी काळात सायबर क्राईमती गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात प्रयत्न महाराष्ट्र शासन करत राहील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.

या चर्चासत्रात राज्यासह, युरोप, चीन, अमेरिका, नेपाळ ,अशा – विदेशातून व भारतातून विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच याकार्यक्रमाचे प्रक्षेपण स्त्री आधार केंद्राच्या फेसबुक खात्यावरूनही प्रक्षेपित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अपर्णा पाठक यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...