Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यातील रस्सीखेच लई भारी,अन नेत्यांची मात्र मती मारी?

Date:

पुणे: कॉंग्रेस आणि भाजपाची लढाई पुण्यातून होणार आहे,ही जागा जिंकून आणणे यासाठीची लढाई पहाणे मोठे रंजक ठरणार आहे.प्रसारमाध्यमातून मोहोळ विरुद्ध धंगेकर असे चित्र रंगविले गेले आहे ते वास्तवात आले तर तर भाजप आणि कॉंग्रेसला ते निश्चित जड जाणार आहे.पुण्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो … हे सारे माहिती असूनही नेत्यांची मती का मंद होते आहे हे कार्यकर्त्यांना समजेनासं झाले आहे. भाजपकडून मोहोळ यांना पसंती दिली गेली तर महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची जंत्री प्रचारात चव्हाट्यावर मांडली जाईल, देवदूत च्या खरेदी पासून कात्रज कोंढवा रस्त्याच्या फुगवलेल्या टेंडर पासून, पुराची आपत्ती, 24 तास पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी चा उडालेला बोजवारा,महापालिकेत कारभार करणारे बोगस कामगार, कंत्राटी कामगारांची झालेली पिळवणूक, कोरोना काळात सोमय्या यांनी पोलिसात तक्रार करण्याचे महापौरांना दिलेले आदेश, प्रत्यक्ष झालेला भ्रष्टाचार अशा कितीतरी गोष्टी पुढे पुढे येत रहातील भूतकाळात केलेल्या कारभाराच्या जंत्रीच कसबा निकालाची पुनरावृत्ती घडवेल. आणि कॉंग्रेस ने  धंगेकर यांना उमेदवारी दिली तर महापालिका अतिरिक्त आयुक्तां पासून उपअभियंता आणि कर्मचारी यांना दिल्या गेलेल्या धमक्या,शिवीगाळ कोणासाठी कशासाठी होती यावरून चर्चासत्र घडतील, मनसे तून आलेल्यांना एवढ्या तातडीने कोणत्या विशेष गुणांसाठी, आमदारकी खासदारकी अशा उमेदवारया बहाल केल्या.. यावरून मूळ कॉँग्रेसचे 30/40 वर्षे संघर्षांत वाहत राहिलेले कॉँग्रेसचे पाईक प्रश्ण उपस्थित करतील आणि त्यानुसार प्रचारात उडी घेतील असे सूत्रांना वाटते आहे. भाजपकडे मोहोळ यांच्या व्यतिरिक्त इच्छुक आहेत तसेच कॉँग्रेस कडेही आहेत. यातील कोणाला उमेदवारी दिली तर अन्य सहयोगी पार्ट्या जसे एकनाथ शिंदें ची शिवसेना,  ठाकरेंची शिवसेना, शरदपवार गट, अजितपवार गट,वंचित आघाडी, आठवले रिपब्लिकन हे कोणत्या उमेदवारांना मनापासून आणि वर वर साथ देतील याचा विचारही केला गेला पाहिजे असे सूत्रांचे म्हणणे आहे, कोणाचा पूर्ण लोकसभा मतदार संघात प्रभाव आहे? विद्यमान आमदारांतले किती आमदार कोणाच्या पाठीशी जास्त ताकदीने उभे रहातील, मराठा कार्ड चा कसा उपयोग होईल? व्यापारी वर्ग कोणाच्या पाठीशी आहे, चाकरमानी, निवृत्त वर्ग कोणाला पसंती देतील अशा प्रश्नांवर कार्यकर्त्यां मध्ये खल होतो तो नेत्यांमध्ये का होतो की नाही? असा सवालही उपस्थित केला जातोय. भाजपकडे संजय काकडे, जगदीश मुळीक,राजेश पांडे इच्छुक आहेतच या शिवाय ही नावे आहेत. तर कॉंग्रेस कडे मोहन जोशी,आबा बागूल,अभय छाजेड, अरविंद शिंदे असे ही इच्छूक आहेत. कॉंग्रेस ने धंगेकर यांना उमेदवारी दिली आणि ते आलेही निवडून तर कॉंग्रेसच्या इथल्या राजकारणाचा, कॉंग्रेस भवना चा चेहरा मोहरा बदलून जाईल, इथे निष्ठेला किंमत नाही हा संदेश जाऊन, मूळची कॉंग्रेसच लयाला जाईल आणि भाजपने मोहोळ यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आले मोहोळ तर भाजप मध्येही प्रामाणिकपणे कष्ट करून काही उपयोग नाही असा संदेश जाऊन होयबा, होयबा चीच भाजप पुढील काळात दिसेल असेही सूत्रांना वाटते आहे. कोणाचे काहीही मत असू द्यात नेत्यांची मती मात्र माती खाता कामा नये, आणि विशिष्ट वर्गाचे नाही तर सर्वधर्मीय मतदारांचे हितकारक निर्णय घेणारेच, सर्वधर्मसमभाव,लोकशाही मानणारेच लोकप्रतिनिधी म्हणुन यापुढे आले पाहिजेत एवढे मात्र निश्चित. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...