Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

थिएटर जगवा..चर्चेला प्रारंभ…सिंगल स्क्रीनला पूर्ण कर माफी द्या..

Date:

मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी  शासनाचा संवादरूपी ‘कलासेतू’

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत आणि शासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यविभाग आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात (दादासाहेब फाळके  चित्रनगरी ) यांच्या वतीने गुरुवारी ‘कलासेतू’ या विशेष अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे उपस्थित होते.

पहिल्या परिसंवादाला ज्येष्ठ  तंत्रज्ञ उज्वल  निरगुडकर, वितरक  समीर दिक्षित, लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे,  कामगार नेते विजय हरगुडे आदि  मान्यवरांनी सहभाग घेतला.  या मान्यवरांना मिडिया वनचे गणेश गारगोटे यांनी  बोलतं  केलं.  या परिसवांदाच्या माध्यमातून मराठी  चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी  काय करता येईल याचा परामर्श घेण्यात आला. ‘मराठी  चित्रपटसृष्टीसमोरील  नवी  आव्हाने’  या  पहिल्या परिसंवादात ‘ १५०० हुन अधिक  चित्रपट  तयार  होतात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न  होणे तसेच अमेरिका फिल्म मार्केटची माहिती निर्मात्यांना देणे, सबटायटल बाबत कार्यशाळा आयोजित करणे आदि  वेगवेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले. 

‘शासकीय धोरण आणि वेबपोर्टल’ या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष  पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी  झाले होते.  मराठीला चित्रनगरीत  ५० % सवलत  देणे,  SGST  बंद  करणे, करपती योजना चालू करणे , अनुदान बंद करणे, निर्माता होण्याकरिता नियमावली  तयार  करणे, आंतरराष्टीय चित्रपटासाठी पॅनल निर्माण करणे, निर्मात्यांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ,सिंगल स्क्रीनचे कर माफ करणे आदि  मुद्द्यांचा उहापोह करण्यात आला.

तिसऱ्या परिसंवादात ‘चित्रपट निर्मिती, वितरण, विपणन’ याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे,  दीपक  देऊळकर,अभिनेत्री किशोरी शहाणे, चैतन्य चिंचलीकर, विकास खारगे  या मान्यवरांनी सहभाग घेतला. नवीन निर्मात्यांना मार्गदर्शन करणे,मल्टिप्लेक्स दर कमी करणे, मराठीसाठी २०० हुन अधिक चित्रपटगृह बांधणे, एसटी स्टॅडजवळ मल्टीप्लेक्स उभारणे, वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदी अनेक उपायांचा अंतर्भाव यात करण्यात आला.

भविष्यातील बदलाची पावले ओळखून आणि येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाचा विचार करून मराठी चित्रपटसृष्टीने सर्वांगाने वेगळा  विचार करण्याचा सूर ‘कलासेतू’ च्या परिसंवादात उमटले. आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटांचा  सहभाग, मराठी चित्रपट महामंडळाचे योगदान, चित्रपटसृष्टीला  इंडस्ट्रीचा दर्जा देणे, इतर भाषिक लोकांचे रजिस्ट्रेशन, ओटीटी प्लॅटफॉर्म तयार करणे,  फिल्मसिटीमध्ये AUGMC त्यात करणे, चित्रपटगृह, नाट्यगृह उभारणे आदी सुविधा प्रामुख्याने होणे गरजेचं असल्याचं मत सर्वांनीच मांडलं. 

या सगळ्या सूचनांचा विचार करून शासन आवश्यक त्या सर्व गोष्टींचा निश्चितच पाठपुरावा करेल असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. शासनातर्फे अनेक नव्या योजना, प्रस्ताव  लागू करण्याचा मानसही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलून दाखविला. कलासेतू च्या माध्यमातून  संवादाचा निर्माण झालेला हा पूल  मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर  नेण्याचा ‘राजमार्ग’ ठरेल असा विश्वास सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त  केला. 

यावेळी किरण शांताराम,समृद्धी पोरे,प्रिया बेर्डे, किशोरी शहाणे,नानूभाई जयसिंघानी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते,  दिग्दर्शक, कलाकार तंत्रज्ञ आणि वाहिन्याचे प्रमुख उपस्थित होते.

थिएटर जगवा…अशी हाक पुण्यातील सलाम पुणे संथेने दिली असून त्यादृष्टीने शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत.सिंगल स्क्रीन ला पूर्णतः करमाफी द्यावी ,वीज मिळकत कर,पाणीपट्टी ,सफाई कर अशा कोणत्याही पद्धतीचा तसेच कोणतीही GST लावू नये. सिंगल स्क्रीन च्या आवारात असलेल्या रेस्टॉरंटलाही कर माफी असावी ,त्यांच्या कडून त्याच्या पुरते फार तर विजेचे बिल घ्यावे. अशा पद्धतीने देता येईल तेवढे दिल्यास सिंगल स्क्रीन चा जमाना पुन्हा पूर्ववत कुठे उभा करता येईल .सिंगल स्क्रीन जगवा अशी हाक सालाम पुणे ने दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...