Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खंडणी मागणाऱ्या ‘माथाडी बोर्डाचे नेते’टोळीला लावला मकोका

Date:

पुणे- आम्ही माथाडी बोर्डाचे नेते आमचेच कामगार काम करतील आणि एका गाडीमागे १५ हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील अशा पद्धतीने खंडणी वसूल करणाऱ्या शेखर मोडक,साहस पोळ आणि टोळीप्रमुख संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर याच्यासह ६ जणांच्या टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.यातील तीन आरोपी फरार आहेत .देवकर याने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुप्तपणे किंवा गैरपणे एखाद्या व्यक्तिला परिरध्द करण्यासाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तिला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ५ साथीदार यांचे विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यांनी एका फिर्यादी यांचे मालकीचे ऊरळी देवाची गावचे हदीतील गोडावुनमध्ये यातील आरोपी व त्यांचे साथीदार यांनी मिळुन “आम्ही माथाडी बोर्डाचे नेते असुन गोडावुन मधील काम आमचे माथाडीचे कामगार करणार असे” म्हणून फिर्यादी यांना याबाबत कोणतीही नोटीस न देता त्यांचे गोडावूनमधील काम बंद केले तसेच काम चालु करायचे असेल तर एका गाडी पाठीमागे १५,०००/- रूपये दया तरच काम चालु करा त्यावर फिर्यादी यांनी गोडावूनमध्ये काम करण्यासाठी माथाडी कामगार ठेवायचे नाहीत व माथाडी कामगार परवडत नाही असे म्हणाले परंतु आरोपी यांनी निदान एका गाडी पाठीमागे ७०००/ रूपये दे नाहीतर तुझ्या गोडावुन मध्ये येणा-या गाड्या तु कशा खाली करतो तेच बघतो असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली त्याबाबत फिर्यादी यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.४८/२०२४ भादविक ३८७,१४३, १४७,१४९,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी नामे १) संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर वय३४ वर्ष रा. अॅक्वा मॅजेस्टिक सोसा. डी बि. फ्लॅट नं. २०४ फुरसुंगी ता. हवेली जि पुणे २) शेखर अनिल मोडक वय २९ वर्षे रा. वडकी गावठाण, सरकारी विहीरी शेजारी ता. हवेली जि. पुणे. ३) साहस विश्वास पोळ वय २५ वर्ष रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, जे १०१, वडकी गाव, ता. हवेली, जि. पुणे. यांना दाखल गुन्ह्यात अटक केली असून, आणखीन तीन आरोपी wanted आहेत.
संबधित आरोपी १) संतोष ऊर्फ आण्णा किसन देवकर (टोळी प्रमुख) हा लोणीकाळभोर
पोलीस स्टेशन अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलूम जबरदस्ती करुन किंवा अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन सदर टोळीने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुप्तपणे किंवा गैरपणे एखाद्या व्यक्तिला परिरध्द करण्यासाठी तिचे अपनयन किंवा अपहरण करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तिला मृत्यु किंवा जबर दुखापत यांची भिती घालणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन, त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेकामी लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,शशिकांत चव्हाण यांनी पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहरआर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.सदर प्रकरणाची छाननी करुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४८/२०२४ भादविक ३८७,१४३,१४७,१४९,५०४,५०६ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परि- मंडळ ०५, श्री. आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती. अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) श्री. सुभाष काळे, सपोनि किशोर पवार, पोउनि अमोल घोडके, सर्वेलन्स अंमलदार तेज भोसले, संदीप धनवटे, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. २०२४ या चालु वर्षातील मकोका अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...