श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस देण्याचा उपक्रम सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पार पडला. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या हस्ते धान्य तुला पूजन आणि सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांती समृद्धी करिता प्रार्थना देखील करण्यात आली.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह विश्वस्त उपस्थित होते.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू यांच्या उत्सवमूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप करण्याचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, तेल, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली.
महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्य तुला व सोने-चांदी पुष्पअर्पण –
Date:

