Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

79% भारतीय सुट्टीवर असताना घराच्या सुरक्षेची करतात चिंता

Date:

मुंबई,21 फेब्रुवारी,2024: सुट्ट्या म्हणजे आराम करणे, टवटवीत करणे आणि रोजच्या धकाधकीतून विश्रांती घेणे. आपल्या घराबद्दल सतत चिंता करत राहणे ही गोष्ट सुट्टीच्या दिवशी आपल्यापैकी कोणालाही अगदीच शेवटची असते. तरीही, गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी, गोदरेज आणि बॉईसचा व्यवसाय, गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सच्या ‘Live Safe, Live Freely’ या नवीन संशोधन अभ्यासात असे आढळून आले आहे की अशी चिंता अनेकदा सुट्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यत्यय आणतात.

याबाबत बोलताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे बिझनेस हेड श्याम मोटवानी म्हणाले की‘LiveSafe, LiveFreely’ या अभ्यासाचे निष्कर्ष हे उघड करतात की सुट्टीतील प्रवासी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेच्या चिंतेत कायम असतात. दारं नीट लावली होती की नाही हे प्रश्न त्यांच्या मनात वेकेशनवर असताना रेंगाळत राहतात. हे स्पष्ट आहे की चिंतामुक्त प्रवासासाठी घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे सर्वात आवश्यक आहे. घराच्या सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या व्हेकेशनचा पूर्ण आनंद लुटता येतो. डिजिटल लॉकसारख्या प्रगत उपायांसह, व्यक्ती आता चिंतामुक्त प्रवास करू शकतात, कारण ते हे लॉक दूरस्थपणे मोबाईल ॲपद्वारे Wi-Fi सह जगातील कोठूनही ऑपरेट करू शकतात. गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्समध्ये, सुरक्षिततेशी तडजोड न करता व्यक्तींना मुक्तपणे जगण्यासाठी चिंतामुक्त करणारे अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आहे.”

‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचा उद्देश भारतीयांच्या जीवनशैलीबद्दल आणि घराच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल मौल्यवान माहिती देणे, त्यांना मानसिक शांती आणि चिंता न करता जगण्याचे स्वातंत्र्य देणे हा आहे.

प्रवास हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा फोकस क्षेत्र म्हणून उदयास आला असून, प्रतिसादकर्त्यांपैकी 79% लोकांना सर्व दारे आणि खिडक्या व्यवस्थित लॉक केल्या आहेत की नाही याविषयी व्हेकेशनवर असताना सतत चिंता वाटत असते. शिवाय, 40 टक्के लोकांनी वृद्ध पालकांनी त्यांच्या चाव्या विसरल्याबद्दल किंवा हरवल्याबद्दल आणि लॉक आउट केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.जर त्यांच्या घराची चिंता त्यांना नसेल तर ते लांब व्हेकेशनला वर्केशनमध्ये बदलू इच्छितात असे 48 टक्के लोकांचे म्हणणे असल्याचे या संशोधन अभ्यासात दिसून आले आहे. टेक गॅजेट वापरू इच्छितात घराची सुरक्षा दिवसातून एकदा तरी तपासू इच्छितात असे 49 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 29 टक्के लोक म्हणतात की ते त्यांच्या घराची सुरक्षितता ऑफिसमध्ये बसून दर तीन तासांनी तपासतील.

सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब करताना मानवी वर्तन समजून घेण्याचे उद्दिष्ट ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचे आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांमध्ये 2,000 व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...