पुणे -बारा वर्षाच्या मुलाचे कात्रज येथून अपहरण करून ७० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल होताच पुणे पोलिसांनी वेगाने केलेल्या हालचालीमुळे सहा तासांचे आत मुलाची सुखरुप सुटका झाली मात्र अपहरण करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हातून निसटले .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका बारा वर्षाच्या मुलाचे भिलारवाडी कात्रज पुणे येथुन आरोपी राजेश सुरेश शेलार याने त्याचे चारचाकी गाडीमधुन दिनांक १८/०२/२०२४ रोजी सांयकाळीचे सुमारास घेवुन जावुन अपहरण करुन मुलाला सोडण्याच्या बदल्यात ७० लाख रुपयांची पैशाची मागणी केली. तसेच पोलीसांत तक्रार केली तर मुलाचे जीवीताची बरे वाईट करणची धमकी दिली. मुलाच्या पित्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन ताकाळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु र नं १५६/२०२४ भादवि कलम ३६४(अ), ३८७,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आणि
घटनेचे गांभिर्य पाहुन पोलीस उप आयुक्त, परि २, पुणे शहर, पोलीस उप आयुक्त, गुन्हे , सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग यांनी घटनास्थळी भेट देवुन मुलाची सुखरुप सुटका व आरोपीचा शोध होणेबाबत मार्गदर्शन करुन दिलेल्या सुचनांप्रमाणे लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी तीन वेगवेगळी तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषणावरुन प्राप्त माहीतीचे आधारे आरोपीबाबत मिळालेल्या माहीतीनुसार सातारा दिशेने सदरची पथके रवाना करुन यातील अपहरण झालेल्या मुलाचा व आरोपींचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारावरुन आरोपी हे अपह्त मुलास घेवुन पाटेघर, ता. जि. सातारा येथील डोंगरामध्ये लपले आहेत अशी माहीती मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखा युनिट २ चे पथकांनी स्थानिक सातारा एल.सी.बी कडील अरुण देवकर व त्यांचा पोलीस स्टाफ याचे मदतीने संपुर्ण डोंगर परीसर पिंजुन काढत असताना आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्याने त्यांनी अपह्त मुलांस डोंगरातच सोडून अंधारामध्ये पळुन गेले. पोलिसांनी लागलीच मुलाला सुखरुप ताब्यात घेतले. पोलीसांनी एका रात्रीत तपास करुन एक लहान मुलाची आरोपीकडुन सुखरुप सुटका करुन लहान मुलाचे प्राण वाचविले आहे. आरोपी फरार असुन त्याचा पोलीस पथके शोध घेत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील , पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, , अमोल झेंडे, ,सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगल मोडवे, सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, आणि गुन्हे शाखा, युनिट २, पुणे शहरचे श्री अमोल रसाळ व त्यांचे कडील पोलीस स्टाफ व सातारा स्थानिक गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर व त्यांचेकडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.
बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून ७० लाखाची मागितली खंडणी,पोलिसांनी सहा तासांत मुलाची केली सुटका पण … दक्षिण पुण्यातील गुन्हेगारी
Date:

