शिवस्मारकास होत असलेला विलंब अक्षम्य..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे – रयतेप्रती समर्पित छत्रपतींची ‘शिवमुद्रा’ तर नागरीकांप्रती समर्पित संविधान’ याचे साम्य ‘भारतीय संविधानात’ असल्याने, शिव छत्रपती, शाहू महाराज व महात्मा गांधी या राष्ट्रपुरूषांची ‘समता, न्याय व कल्याणकारी राज्याचे’ अंतिम ध्येय एकच असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. पुणे मेडीसीन डिलिव्हरी असोसिएशन तर्फे आयोजित सदाशीव पेठ परीसरांत दुचाकी रॅली – शिवजयंती अभिवादन व लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस तर्फे आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवमुद्रेचे प्रतिबिंब असणारे ‘लोकार्पित संविधान’ हे प्रजासत्ताक देशात राजधर्म निभावण्याचे प्रमुख अंग आहे. संविधानास अभिप्रेत राजधर्म निभावण्याची अपेक्षाच् सत्तापक्षाकडुन केली जाते. मात्र तोंड देखलेपणाने रामराज्य व शिव छत्रपतींचे केवळ नांव घेऊन चालत नाही तर राज्यकर्त्यांकडुन कृतीशील राजधर्माचा अवलंब ही अपेक्षीत असतो. सरकारची शिवस्मारकाची ईच्छा शक्ती कमी असले मुळेच् कोट्यावधींचा सरकारी निधी खर्च करून ही, सु ८ वर्षापुर्वी मोठा डंका पिटत पंतप्रधान मोदींनी केलेले भुमिपुजन’ करून शुभारंभ केलेले मुंबई_समुद्रातील नियोजित शिवस्मारक झाले असते तर… सरकारवर ‘गॅरंटीच्या जाहीराती’ देण्याची वेळ आली नसती..! असे प्रतिपादन राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी या प्रसंगी केले.पुण्यातील महापालिकेच्या शिवस्मारकासाठी महापालिकेच्या सभागृहात फेटे घालून शहरभर हत्तीवरून पेढे वाटण्याच्या घोषणा झाल्या, फडणविसांनी बैठका घेऊन तोंडाला पाने पुसली असे ते म्हणाले. आमदार मोहन जोशी यांनी आपल्या भाषणात पुणे शहरात झालेल्या महीला अत्याचाराचा निषेध केला व मेडीसीन डिलीव्हरी बॅाईज ना तोंड द्यावे लागत असलेल्या वहातुक कोंडी साठी त्यांनी ‘वेकअप पुणेकर’ मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते शिव छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत – प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ पुणे लोटस चे अध्यक्ष व पुणे काँग्रेस व्यापारी सेलचे ऊपाधक्ष श्री प्रसन्न पाटील यांनी केले तर सुत्र संचालन पुणे मेडीसिन डिलिव्हरी असोसिएशन अघ्यक्ष श्री पप्पू गुजर यांनी केले. या प्रसंगी श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळांचे अघ्यक्ष युवराज निंबाळकर, केमिस्ट असोसिएशन चे संजय शहा, ॲड स्वप्नील जगताप, संजय आबा बिबवे, गणेश शिंदे, संजय कुंजीर, सुरसे पाटील, सुरेश कांबळे, आकाश जाधव, संजय कुंजीर, दिवाकर गोरे ,रवी बनकर इ उपस्थित होते.

