शिवजयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करून काकडेंनी लोकसभेचे फुंकले रणशिंग
पुणे- आज शहरात निघणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विविध मिरवणुकीत सहभागी होत सर्वधर्मियांना आवाहन करत माजी खासदार संजय काकडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले . शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज्य निर्मितीसाठी आणि रक्षणासाठी केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे हाथ बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी वेगवेगळ्या ठीकांनी आपले विचार प्रगट करताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हि महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांच्या सर्वधर्मीय सुराज्याचे आपण सैनिक बनू या असे ते म्हणाले.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. यानिमित्त शहरात आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या वेळी संजय काकडे यांनी लाल महल येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्रिवार वंदन केले. यानिमित्त विविध मंडळांना भेटी देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूरचे युवराज मालोजीराजे, अमितराजे गायकवाड, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, पुणे शहर भाजपाचे सरचिटणीस राहुल भंडारे, माजी नगरसेवक शंकर पवार व राजाभाऊ बराटे, उपाध्यक्ष तुषार पाटील, मंडळाचे अध्यक्ष अजिज शेख, विशाल पायगुडे, माजी नगरसेवक भरत निजामपूरकर, विष्णू हरिहर, विजय मरळ आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

