पुणे-डीईएसच्या ‘आयएमडीआर’ने आयोजित केलेल्या मानव संसाधन या विषयावरील परिषदेचे उद्घाटन सिरम इन्स्टिट्यूटचे महेंद्र इंगे आणि पर्सिस्टंट सिस्टीम्सचे योगेश पाटगावकर यांच्या हस्ते करण्यात आले .पाटगावकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कोणत्या समस्येचे निवारण झाले हे समजून घेतले पाहिजे. कोणताही बदल करताना त्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे.
इंगे म्हणाले, मानव परिस्थितीनुसार बदल स्वीकारत असतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बदलांना घाबरण्याची गरज नाही. त्याचा खुलेपणाने स्वीकार केला पाहिजे.
डीईएसचे विश्वस्त जगदीश कदम यांनी स्वागत केले. आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यावेळी उपस्थित होत्या.
कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक ( मानव संसाधन) यांना “आयएमडीआर उदयोन्मुख मानव संसाधन नेतृत्व” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता व मनुष्यबळ – मित्र की शत्रू, उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्यबळासाठी उपयोग, मानव संसाधन – काल आणि आज या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.
पीटीसीच्या वरिष्ठ संचालिका आकांशा साने, नियामोचे अशोक बिल्डीकर, व्हेरितासच्या दिपाली देवाईकर, विप्रोचे समीर गाडगीळ, हरबिंगरचे डॉ. विकास जोशी, सायटेल इंडियाच्या अनघा चाफळकर आणि असीम इन्फ्रास्ट्रक्चरच्या श्रुती त्रिवेदी यांनी सहभाग घेतला.
‘आयएमडीआर’मध्ये मानव संसाधन या विषयावऱ परिषद
Date:

