पुणे : हडपसर भागातील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पोलिसांना पिण्यास पाणी मागितले. तेव्हा तिला लघुशंका प्यायला सांगण्यात आले, असा आरोप महिलेने केला आहे.या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दामिनी पथकातील दोन महिला पोलिसांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिले आहेत.सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्यात दि. 1फेब्रुवारी 2024 रोजी भादंवि 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्हयातील फिर्यादीने संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या घरात काम करणार्या महिलेला दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजी हडपसर पोलिसांनी सीआरपीसी 160 प्रमाणे नोटीस देऊन मगरपट्टा पोलिस चौकीत चौकशीकामी बोलाविण्यात आले होते. संशयित आरोपी असलेली तक्रारदार महिला मगरपट्टा सिटीत एका कुटुंबात घरकाम करते. मगरपट्टा पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथे वास्तव्यास असलेल्या यामहिलेला पोलीस चौकीत चाैकशीसाठी नेले. पोलीस चैाकीत तिला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेला साडेचार तास डांबून ठेवण्यात आले. महिला घरी न आल्याने तिचे कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी मगरपट्टा पोलीस चौकीत गेले. तेव्हा पोलिसांनी नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्या पोलिसांना चौकीत पाणी मागितले. तेव्हा त्यांनी लघुशंका पिण्यास सांगितले, असा आरोप महिलेने केला.सोशल माध्यमातून या महिलेचा हि हकीकत सांगणारा व्हिडीओ प्रसारित झाला.त्याची दखल घेवून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या सूचनाप्रमाणे संबंधित महिलेच्या आरोपाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद दोरकर, दामिनी पथकातील पोलिस अंमलदार उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय्य चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले आहे.
पोलिसांकडून महिलेला चौकीत मारहाण,पिण्यास पाणी मागितले, तर लघुशंका प्यायला…API सह दोन महिला पोलीस निलंबित
Date:

