महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

Date:

पुणे- महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र कारागृह विभागाचे एकुण पाच विभाग असुन विभागीय स्तरावरुन विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या खेळाडुंनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे अथवा जे खेळाडु विजेते आहेत अशा खेळाडुंकरीता दरवर्षी मुख्यालय स्तरावरुन वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, पुणे येथे करण्यात येते. सन 2023-2024 च्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन दिनांक 12.02.2024 रोजीअपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांचे हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) तथा राज्यस्तरीय क्रीडा समितीच्या अध्यक्षा श्रीमती स्वाती साठे तसेच श्रीमती जुगनु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी अमिताभ गुप्ता व स्वाती साठे यांनी उपस्थित सर्व खेळाडुंना मार्गदर्शन केले. उदघाटन सोहळया प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरुष व महिला खेळाडुंच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
दिनांक 12.02.2024 ते 16.02.2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभाग, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग व नागपूर विभागातील जवळपास 220 खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन या स्पर्धांमध्ये पुरुष व महिला खेळाडुंसाठी 100 मी धावणे, 200 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनीस एकेरी हे वौयक्तिक खेळ तसेच कबडडी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. मा. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) श्री अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतुन सन 2024 या वर्षापासुन क्रिकेट या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व खेळाडुंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
शारीरीक व मानसिक स्वास्थ निरोगी राहण्याकरीता खेळाला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. खेळामुळे संघभावना वाढीस लागुन खेळाडुमध्ये शिस्त आणि कामाचा उत्साह वाढीस लागतो. त्याचबरोबर शारीरीक व मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन होऊन एकाग्रता सुधारण्यास मदत होते. निरोगी खेळाडु हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज, निरोगी देश घडवतो, याच प्रमुख उददेशाने कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा, त्यांच्या मध्ये संघभावना वाढीस लागावी व दैनंदिन कामकाजाच्या ताणतणावातुन विरंगुळा मिळावा याकरीता विभागीय व राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
सदरच्या उदघाटन सोहळयाकरीता कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग) योगेश देसाई, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालयाचे प्राचार्य नितीन वायचळ , येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकसुनील ढमाळ, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षकवौभव आगे, येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर तसेच इतर कारागृहांचे अधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच खेळाडु उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...