युवा मोर्चा ने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता सिंहाचा वाटा ठेवावा – आमदार नितेश राणे

Date:


पुणे:ता१२- ‘ युवा मोर्चा ने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता कामात सिंहाचा वाटा ठेवावा. कार्यकर्त्याने सचोटीने काम करावे जेणेकरून दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडली तरच त्या पदाला न्याय दिला असे लोक मानतील असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले
भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी नियुक्ती पत्र वितरण समारंभात आमदार राणे बोलत होते. पुढे आमदार राणे म्हणाले की जे चुकीचे घडते त्याविषयी प्रकट होऊन व्यक्त होऊन ते जर बरोबर केले तरच आपली किंमत राहते मोदींजींच्या विकासाच्या व्हिजन वर आजचा तरुण विश्वास ठवतो पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण मोदींच्या मुळे शक्य झाले ज्या लोकांची मोदींजींच्या विषयी बोलण्याची लायकी नाही अशा माणसांनी जर टीका केली त्याला योग्य धडा शिकवला त्याचा आम्हाला अभिमान आहे.आपण अभिमानाने सांगितले पाहिजे की आम्ही मोदींजींचे कार्यकर्ता आहोत जो आत्मविश्वास मोदींजींच्या भाषणात असतो त्याच आत्मविश्वासाने युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने काम केले पाहिजे’.
या वेळी बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की करण मिसाळ यांनी युवा मोर्चाचे एक यशस्वी अध्यक्ष म्हणून नाव लौकिक करावे आमदार नितेश राणे यांचा आदर्श घेऊन काम करावे स्वतःची ओळख निर्माण करावी. हा देश युवा आहे या देशात युवा साठी खूप उज्वल आणि अश्वसक काळ मोदींजींच्या मुळे सुरू झाला आहे.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी युवा च्या उलटे वायू असे होते त्यामुळे युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी वायू वेगाने काम करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.
यावेळी बोलताना युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ म्हणाले कीआजचा युवा हा अधिक जागरूक चांगलं वाईट हे त्याला बरोबर कळत त्यामुळे तो मोदींच्या गॅरंटी वर पूर्ण विश्वास ठेवून भा ज पा बरोबर आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार नितेश राणे, शहराध्यक्ष धीरज घाटे,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, सरचिटणीस पुनीत जोशी,राघवेंद्र मानकर ,रवींद्र साळेगावकर निवेदिता जोशी प्रतीक देसरडा आदी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक आमदार राणे यांच्या हस्ते देण्यात आले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...