सामान्य माणसाला भयमुक्त वाटावे असे काम करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

नाशिक, दि. १०: सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचे रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. या उक्तीप्रमाणेच सामान्य माणसाला भयमुक्त व सुरक्षितेचे ठिकाण वाटेल यादृष्टीने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शहरातील सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे,  पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किरण कुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कोनशिला अनावरण करून नूतन इमारतीचे उद्घाटन केले. ते म्हणाले की, या नूतन इमारतीत अद्ययावत यंत्रणा व सेवा- सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आलेल्या आहेत. सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणी एकमेकांशी जोडली जाणार आहेत. पोलीस स्टेनशच्या सुंदर इमारतीसारखचे येथील अधिकारी व कर्मचारी निश्चितच उत्तम काम करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून ५ कोटींच्या निधीतून साकारलेल्या सातपूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा आहेत. वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन, अंमलदार व तक्रारदारांसठीची स्वतंत्र दालन आहे. इमारत ही दुमजली असल्याने पोलिसांच्या कामाकाजाच्या दृष्टीकोनातून विभागवार सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

०००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनोळखी लिंकवर क्लिक, मोबाईल केला हॅक;अन आठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे:एका ज्येष्ठ नागरिकास मोबाईलवरील अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात...

महिलेवर लैंगिक अत्याचार:पुण्यात आणखी एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल

पुणे: पती-पत्नीतील मतभेद दूर करून पुन्हा...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर...

आमन तांबे :- आधुनिक तमाशा सृष्टीचा ‘बादशाह’

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला...