तळेगाव एमआयडीसीमधील स्विचिंग स्टेशनचे भूमिपूजन

Date:

औद्योगिकसह १६५० ग्राहकांना होणार दर्जेदार वीजपुरवठा

पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२४: तळेगाव एमआयडीसीमधील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मिंडेवाडी येथे २२/२२ केव्ही क्षमतेचे स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. ७) महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. या स्विचिंग स्टेशनमुळे तळेगाव एमआयडीसी तसेच लगतच्या पाच गावांतील सुमारे १६५० औद्योगिक, घरगुती, वाणिज्यिक व इतर वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

       तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांच्या संख्येसह विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी तळेगाव एमआयडीसी फेज दोनमधील मिंडेवाडी येथे २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग व श्री. राहुल तिडके (एमआयडीसी), कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके व श्री. दिलीप जोगावे (एमआयडीसी) आदींची उपस्थिती होती.

       तळेगाव एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये सुमारे १५० उच्च व लघुदाबाचे औद्योगिक ग्राहक आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच जाधववाडी, बाधलवाडी, मिंडेवाडी, करंजविहिरे, नवलख उंब्रे या परिसरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सुमारे १५०० ग्राहकांना या स्विचिंग स्टेशनमधून निघणाऱ्या आठ वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होणार आहे. येत्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करून स्विचिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे अशी सूचना यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केली.

या कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र गोरे, शैलेश गिते, उपअभियंता संध्या बामणीकर (एमआयडीसी), सहायक अभियंता श्री. प्रशांत पवार, विजय कांबळे, सतीश ठिगळे व संतोष सूवर्णेकर (एमआयडीसी) आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...