भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स : संगीत नाटक अकादमी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आसाम मधील सत्रीय या शास्त्रीय नृत्य शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षी शास्त्रीय ‘नृत्यपर्व’ महोत्सव गुवाहाटी आसाम येथे आयोजित करण्यात येतो. या वर्षीच्या सत्रीय नृत्यपर्व’ महोत्सवात पुण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आसाम मधील नृत्य प्रकार शिकून अतिशय सुंदर पद्धतीने सत्रीय नृत्यशैली सादर केली.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरण्याला आसाम येथील अनेक मान्यवर सत्रीय नृत्यगुरु उपस्थित होते. या सादरीकरणाला संगीत नाटक अकादमीचे सेक्रेटरी राजूदास उपस्थित होते. आसाम मधील काही निवडक संस्था आणि आसाम मधील दोन विश्वविद्यालये यांच्या बरोबरीने आसाम बाहेरील एकमेव विद्यापीठ म्हणजे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थी आणि शिक्षक कलाकार यांचा सांस्कृतिक आदान-प्रदान कार्य्रक्रम तेझपूर केंद्रीय विश्वविद्यालय येथे झाला.
या सर्व कार्यक्रमात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांबरोबर सत्रीय नृत्य शिक्षिका डॉ. देविका बोरठाकूर यांचा सहभाग आणि मार्गदर्शन होते. तसेच या प्रकल्पात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.
याच बरोबर प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालय गुवाहाटी आसाम येथे ‘ललित कलांचे महत्त्व आणि उपयोग’ या विषयावर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे विषयतज्ज्ञ म्हणून मार्दर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानाला प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालयाचे कुलगुरु, कुलसचिव, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

