Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत:- नाना पटोले

Date:

तिघाडी सरकारने राज्याचा सामाजिक समतोल बिघडवून विद्वेषाची बिजे पेरली.

ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकार पुरस्कृत नौटंकी

मुंबई दि. ४ फेब्रुवारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत आहेत. छगन भुजबळ हे आपण राजीनामा दिल्याचे सांगत आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत हे स्पष्ट आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक सरकारने सत्तेत येताना संविधानाला पायदळी तुडवून लोकशाहीला काळीमा फासला आणि आता सत्तेत आल्यापासून राज्यातला सामाजिक समतोल बिघडवून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणतात मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्यानंतरच ओबीसी आरक्षण बचावासाठी मेळावे सुरु केले आणि सोबतच ते म्हणतात राजीनाम्याबाबत वाच्यता न करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. म्हणजे भुजबळांचे बोलविते धनी सरकारच आहे. भुजबळ ओबीसींच्या बाजूने बोलत असल्याचे दाखवत आहेत आणि शिंदे गटाचे आमदार भुजबळांच्या विरोधात बोलत आहेत. ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री कोणीही यांना रोखत नाही उलट त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात मराठा ओबीसी समाजात भांडणे लावण्याचे सरकारच करत आहे हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत, आज त्याला पुष्टी मिळत आहे. या सगळ्या वादामध्ये आणि चिखलफेकीमध्ये महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या याबद्दल सरकार चकार शब्द काढत नाही. किंबहुना या मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकारनेच हा वाद सुरु केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती पूर्ण केली असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व तमाम शिवप्रेमी जनतेचा घोर अपमान केला आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी छत्रपतींचा वारंवार अपमान केला जात आहे. शिंदे-भाजपा सरकार मराठा व ओबीसी समाज या दोघांनाही फसवत आहेत पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, आरक्षणाच्या नावावर लोकांची डोकी फोडू नका, महाराष्ट्र पेटवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते जनतेने यशस्वी होऊ दिले नाहीत आता आरक्षणाचा वाद पेटवून गावखेड्यातील वातावरणही दुषीत करण्याचे पाप केले जात आहे. राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या या शिंदे-भाजपा व अजित पवार सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असे नाना पटोले यांनी खडसावून सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...