अथलेटिक्स स्पर्धांच्या पहिल्या दिवशी एकूण २०७४ सहभागींनी असामान्य कौशल्य दाखवले. त्यामध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, लांब उडी आणि मेडले रिले यांचा समावेश होता.
● चौथ्या दिवशी बुद्धीबळ स्पर्धेत २०५ खेळाडूंचा सहभाग
● पुण्याला लवकरच मिळणार क्रीडा क्षेत्रात ‘पहिल्या क्रमांकाची शाळा’
पुणे, २४ नोव्हेंबर २०२३ – एसएफए चॅम्पियनशीपच्या चौथ्या दिवशी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अथलेटिक्स आणि बुद्धीबळाची उत्सुकता अनुभवण्यास मिळाली. आज मैदानावर सात खेळांमध्ये मिळून २०७४ खेळाडूंनी भाग घेतला. बॅडमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, कराटे, थ्रोबॉल, अथलेटिक्स आणि बुद्धीबळ या खेळांचा त्यात समावेश होता. वैविध्यपूर्म खेळांच्या या पार्श्वभूमीवर अनुभवी बास्केटबॉल प्रशिक्षक फैझान शेख यांनी एसएफए चॅम्पियनशीपचा लक्षणीय प्रभाव पडत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘एसएफएने क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे, जो शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि आवड निर्माण करेल. लहान वयातच खेळाची आवड निर्माण करून, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांचा विकास केला जाईल.’
पाचवा दिवस #SheisGold चं स्पिरीट साजरा करणारा आहे. #SheisGold हा एसएफए चॅम्पियनशीप्सचा खास उपक्रम असून त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रातील कुशल मुलींना उद्याचे (२५ नोव्हेंबर जी) चॅम्पियन्स बनवण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. क्रीडा स्पर्धा नव्या उंचीवर पोहोतत असतानाच जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल स्पर्धांनाही सुरुवात झाली, तर बुद्धीबळप्रेमी अंतिम फेरीच्या उत्सुकतेमध्ये आहेत.
एसएफए चॅम्पियनशीप्स देशातील तरुण खेळाडूंसाठी खेळ सहजपणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून आजच्या गुणवत्तेचे उद्याच्या विजेत्यांमध्ये रुपांतर करण्याचे ध्येय आहे. स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) आणि व्हायकॉम१८ यांनी देशभरातील क्रीडा चाहत्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा सहज उपलब्ध करून देण्यासाठी भागिदारी केली आहे. व्हायकॉम१८ एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात चांगले क्षण ३ डिसेंबरपासून जिओसिनेमा, स्पोर्ट्स१८-२ आणि स्पोर्ट्स१८ खेळ वर दाखवणार आहे.
दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रियल टाइम अपडेट्स, हायलाइट्स आणि एक्सक्लुसिव्ह बिहाइंड द सीन्स क्षणांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आमची सोशल मीडिया चॅनेल्स फॉलो करा.
चौथ्या दिवसाचे निकाल
| क्रीडा आणि क्रीडाप्रकार | पदक | विजेते | शाळा |
| (अंडर-१७ मुले) कराटे कुमिते ४३-४८ किलो | सुवर्ण | वीर भोसले | संत तुकाराम माध्यमिक विद्यालय |
| (अंडर-१५ मुले) कराटे कुमिते ४३-४८ किलो | सुवर्ण | अदित हरिप्रसाद शेट्टी | द ऑर्किड स्कूल |
| रौप्य | श्लोक दिगंबर कंदगिरे | पोदारइंटरनॅशनल स्कूल, चिंचवड | |
| ब्राँझ | पार्थराकेश गरियाली | क्रिमसन अनिशआ ग्लोबल स्कूल, मारूंजी | |
| ब्राँझ | शौर्य प्रीतम नाईक | डीईएस शाळा, टिळक रोड | |
| (अंडर-१६ मुले अथलीट्स) २००० मीटर | सुवर्ण | अवनीश मुळे | सरहद स्कूल, कात्रज |
| रौप्य | अविनाश लोंढे | केंद्रीय विद्यालय कमांड कॅम्प | |
| ब्राँझ | अथर्व शिंदे | एस. व्ही. सी. एस. हायस्कूल सोलापूर | |
| (अंडर- १६ मुली अथलेटिक्स ४०० मीटर) | Gold | Ingrid Manuel | St. Joseph High School, Pashan |
| रौप्य | भूमिका सचिन मुत्यालू | ||
| ब्राँझ | वैष्णवी इंगाती | लोकसेवा ई स्कूल पाषाण | |
| (अंडर-७ मुले, बुद्धीबळ) | सुवर्ण | तनय माहेश्वरी | ध्रुव ग्लोबल स्कूल, सूस गाव |
| रौप्य | शिवांश महाजन | एडयुकॉन इंटरनॅशनल स्कूल, बी | |
| ब्राँझ | बन्सीकृष्णन साहू | एडयुकॉन इंटरनॅशनल स्कूल, बी | |
| (अंडर-१७ मुली) कबड्डी | सुवर्ण | न्यू पुणे पब्लिक स्कूल, निगडी | |
| (अंडर-१४ मुले) कबड्डी | ब्राँझ | आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी | |
| (अंडर-१४) कबड्डी | ब्राँझ | पीएमसी स्कूल ८३ बी मालवाडी हडपसर | |
| (अंडर- १६ मुली) थ्रोबॉल | सुवर्ण | आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, वारजे | |
| (अंडर- १६ मुली) थ्रोबॉल | रौप्य | सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक | |
| (अंडर- १४ मुले) थ्रोबॉल | सुवर्ण | सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक | |
| (अंडर- १४ मुले) थ्रोबॉल | रौप्य | आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, वारजे | |
| (अंडर- १८ मुले) थ्रोबॉल | सुवर्ण | सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक | |
| (अंडर-७) मुली स्केटिंग ४०० मीटर इनलाइन | सुवर्ण | विदुषी पांडे | द लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोली |
| रौप्य | गार्गी महाजन | एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड | |
| ब्राँझ | इरा खोत | विस्डम वर्ल्ड स्कूल, हडपसर | |
| (अंडर-७ मुले) स्केटिंग ४०० मीटर इनलाइन | सुवर्ण | अरिश कदम | विद्याशिल्प पब्लिक स्कूल, कोंढवा |
| रौप्य | ध्रुव चोरडिया | सेंट मेरीज स्कूल, पुणे कँटोनमेंट | |
| ब्राँझ | रिवांश घुले | पवार पब्लिक स्कूल | |
| (अंडर-९ मुली) स्केटिंग ५०० मीटर इनलाइन | सुवर्ण |

